सुनील ग्रोव्हर आता ‘सनफ्लॉवर’ वेबसीरीज करणार

sunil grover

कपिल शर्माच्या शोमध्ये गुत्थीची भूमिका करून लोकप्रिय झालेला कलाकार सुनील ग्रोव्हर (Sunil Grover )कपिल शर्माची साथ सोडल्यानंतर यशस्वी झाला नाही. त्याने स्वतः काही विनोदी कार्यक्रमांची निर्मिती केली परंतु ते शो काही चालले नाहीत. आता काही महिन्यांपूर्वी त्याने ‘गँग्स ऑफ फिल्मिस्तान’ नावाने एक कॉमेडी शो तयार केला होता. परंतु या शोला प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्याने लवकर बंद करावा लागला. मात्र आता सुनील ग्रोव्हर लवकरच वेबसीरीजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश करीत आहे.

सुनील ग्रोव्हरच्या या वेबसीरीजचे नाव ‘सनफ्लॉवर’ (Sunflower) असून ही वेबसीरीज लोकांना फसवणाऱ्याची कथा आहे. अशा कथानकांवर यापूर्वी अनेक चित्रपट आले असून ते प्रचंड यशस्वीही ठरले होते. त्याच धर्तीवर ही वेबसीरीज असून यात कॉमेडी आणि अपराधाचे मिश्रण करण्यात आले आहे. सनफ्लॉवर नावाच्या सोसायटीत राहाणाऱ्या लोकांची कथा यात मांडण्यात आलेली आहे.

‘सनफ्लॉवर’ वेबसीरीज विकास बहलने लिहिली असून राहुल सेनगुप्तासोबत तो याचे दिग्दर्शनही करीत आहे. रिलायंस एंटरटेनमेंट द्वारा निर्मित ही वेबसीरीज झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER