सुनील गावस्कर यांचे मोठे विधान, धोनीने सचिन आणि कोहलीला टाकले मागे

Virat-Dhoni-Sachin Tendulkar

IPL २०२० च्या पदार्पणावर अनुभवी सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले की, एमएस धोनीची लोकप्रियता सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली पेक्षा जास्त आहे.

दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर म्हणाले की, दोन वेळा विश्वचषक जिंकणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (mahendra Singh Dhoni) लोकप्रियता सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) पेक्षा खूप जास्त आहे.

माजी भारतीय कर्णधार गावस्कर १३ व्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) समालोचनासाठी UAE मध्ये आहेत. नुकताच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला होता. २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीनंतर त्याने प्रथमच स्पर्धात्मक सामना खेळला.

IPL च्या उद्घाटन सामन्यातून गावस्कर म्हणाले, धोनी रांचीहून आला आहे तेथे क्रिकेटची संस्कृती जास्त नाही. अख्खा भारत त्याचा चाहता आहे. तेंडुलकरचे चाहते मुंबई आणि कोलकाता येथे आहेत तर कोहलीचे चाहते दिल्ली आणि बेंगळुरुमध्ये आहेत, पण धोनीचे चाहते संपूर्ण भारतभर आहेत.’

IPL च्या १३ व्या मालिकेचा बिगुल वाजला आहे आणि पहिल्या सामन्यात एमएस धोनीच्या धुरंधरांनी गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव केला. एसएस धोनी १४ महिन्यांनंतर मैदानात परतला आहे. इतक्या दिवसानंतर पुनरागमन करणाऱ्या या दिग्गज खेळाडूने सर्वांना इशारा दिला आहे की यावेळी CSK अधिक बळकट झाला आहे.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER