केएल राहुल आणि अनिल कुंबळेच्या धैर्याला अभिवादन करतांना सुनील गावस्कर

Sunil Gavaskar - Anil Kumble - KL Rahul

IPL २०२० च्या सुरुवातीला अनेक सामने गमावल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) ने जबरदस्त पुनरागमन केले. महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी पंजाब संघाचे कौतुक केले आहे.

भारताचे महान क्रिकेटर सुनील गावस्करने (Sunil Gavaskar) किंग्ज इलेव्हन पंजाबच्या IPL २०२० च्या शेवटच्या काही सामन्यात चांगल्या कामगिरीचे श्रेय केएल राहुलच्या (KL Rahul) कर्णधारपदाचा आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला (Anil Kumble) दिला.

सलग ५ सामन्यात पराभूत होऊन पंजाब तळाशी होता पण त्यानंतर त्यांनी सलग ५ सामने जिंकले आणि आता १२ गुणांसह चौथ्या स्थानी पोहोचला आहे. ते अजून २ सामने खेळणार आहे आणि त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

गावस्कर म्हणाले, त्यांना विजयाचा मार्ग सापडला आहे. स्पर्धेच्या सुरूवातीस असे वाटत होते की ते साध्य करू शकणार नाही. प्रत्येक वेळी जेव्हा ते विजयाच्या जवळ आले तेव्हा शेवटच्या षटकात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना एक किल्ली सापडली ज्यामुळे ते सामने जिंकायला लागले.’

KKR विरुद्धच्या सामन्यापूर्वी SRH विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबने यशस्वीरित्या १२६ धावांचे बचाव केले. याबाबत गावस्कर म्हणाले, ‘शेवटच्या सामन्यात १२६ धावांच्या बचावासाठी बरेच काही करण्याची गरज होती. आत्मविश्वास दाखविण्याची गरज होती आणि त्यांनी तसेच केले. केएल राहुलने त्यांचे चांगले नेतृत्व केले.’

ते म्हणाले, ‘राहुल कर्णधारपदाच्या भूमिकेत परिपक्व झाला आहे. अनिल कुंबळेच्या भूमिकेकडेही दुर्लक्ष करणार नाही. कुंबळे हा त्याच्या कारकिर्दीत एक सैनिक होता. तुम्हाला आठवत असेल की तो जबडा फुटल्यानंतरही वेस्ट इंडीजविरुद्धच्या २००२ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात गोलंदाजीसाठी मैदानात उतरला होता आणि ही भावना किंग्ज इलेव्हनच्या संघात दिसून येते. ते परत आले आणि आता ते प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शर्यतीत आहेत.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER