रविवार ठरला राज्यात प्रचाराचा सुपरसंडे

मुंबई :- विधानसभा निवडणुकीची प्रचाराची सांगता १९ ऑक्टोबरला शनिवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. त्यामुळे आजचा प्रचाराचा शेवटचा रविवार सुपरसंडे ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार या दिग्गजांच्या सभांच्या तोफा धडाधडल्या. दरम्यान राज्यातील २८८ मतदारसंघात उमेदवारांनी परिसर अक्षरश; पिंजून काढला. लहान मोठ्या सभा, रॅली, कोपरा सभा, आदींनी परिसर निवडणुकमय होवून गेला.

सोमवारी (दि.२१) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रविवारच्या सुटीची संधी साधून जोरदार प्रचार केला. कोपरा सभा, रॅली काढून शक्तीप्रदर्शन करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. गल्ल्या पिंजून काढत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. तर काहींनी मोटारसायकल रॅली काढली. ‍ आजचा सुट्टीचा एकच दिवस प्रचारासाठी मिळत असल्याने रविवारची संध्याकाळही कोपरा सभा, रॅली आणि हळदी कुंकू कार्यक्रमाने गजबजली. रविवारचा सुट्टीचा दिवस साधून उमेदवारांनी घरोघरी संपर्क मोहीम राबविली. गल्लोगल्ली प्रचार यंत्रणेचे वाहन, माहितीपत्रकांच्यासह उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठीवर भर दिला. रविवारचा सुट्टीचा दिवस उमेदवारांना पर्वणी साधून फेरीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सकाळी सात वाजल्या पासून रात्री दहा वाजेपर्यंत कोपरा सभा, पदयात्रा, सार्वजनिक मंडळ, बचत गटाच्या भेटीसह गठ्ठा मतदानाच्यासाठी यंत्रणा दिवसभर कार्यरत राहिली.

ही बातमी पण वाचा : फडणवीसांच्या नेतृत्वाला मत द्या : पंतप्रधान मोदी

मुंबई, ठाणे आणि कोकणासह राज्यातील सर्वच मतदारसंघातील उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी, रॅली आणि पदयात्रांनी मतदारसंघ पिंजून काढला. मतदानापूर्वीचा अखेरचा रविवार असल्याने सर्व शक्तीपणाला लावत पक्ष चिन्हे, झेंडे, टोप्या घेऊन हजारो कार्यकर्त्यांसह उमेदवारांनी मतदारांना आपल्या पारडय़ात कौल टाकण्यासाठी आवाहन केले. यंदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळाल्याने उमेदवारांना प्रचाराचे नियोजन करताना कसरत करावी लागत आहे. रविवार वगळता बहुतांशी मुंबईकर कामानिमित्त घराबाहेरच असतात. त्यामुळे निवडणुकीत अखेरच्या रविवारी उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. प्रत्येक उमेदवाराने आपली ताकद दाखवण्यासाठी आपल्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन केले. गल्लोगल्ली प्रचार करीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करण्याची संधी सोडलेली नाही. मुंबईसह राज्यभरातील सर्वच शहरातील गल्लोगल्लीत प्रचाराचा आवाज कानी पडत होता. आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते कामाला जुंपल्याचे चित्र होते. राज्यभरात रॅली, रोज शो, घरोघर भेटी आणि जाहीर सभांचे आयोजन होताना दिसत होते. त्यामुळे मतदाना पुर्वीचा संडे हा उमेवारांसाठी सुपर संडे ठरला.