… सूनबाईही राष्ट्रवादीच्या वाटेवर? रक्षा खडसे यांचे जयंत पाटील यांनी केले कौतुक

Jayant Patil-Raksha Patil

मुंबई : भाजपाच्या खा. रक्षा खडसे ( Raksha Khadse) यांनी केळी उत्पादकांसाठी केलेल्या आंदोलनाचे केलेल्या आंदोलनाचे कौतुक केले. यावरून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यानंतर सुनबाई रक्षा या पण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा पुन्हा सुरु झाली.

रक्षा यांच्या भूमिकेचे समर्थन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) म्हणालेत, रक्षा खडसे भारतीय जनता पक्षाच्या खासदार असल्या तरी जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्या भूमिका मांडत आहेत. त्यात वावग काय आहे ?

गेल्या महिन्यात एकनाथ खडसेंनी भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ कन्या रोहिणी खेवळकर-खडसेही राष्ट्रवादीत गेल्यात. राष्ट्रवादीत आल्यानंतर एकनाथ खडसे यांना पक्षाने विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी केली आहे. राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीत एकनाथ खडसेंचे नाव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER