ग्रीष्म ऋतुचर्या – दिनचर्येत परिवर्तन व उन्हापासून संरक्षण !

Summer - Maharashtra Today

एप्रिल मे महीना सुरु झाला की सूर्याची किरणे प्रखर होऊ लागतात. उष्णता, गरम झळा, सतत घाम यामुळे ताप आल्याप्रमाणे दाह होत असतो. अंगाची लाही लाही होत असल्याने जनावरे सुद्धा पाण्यात डुंबत असतात. आयुर्वेद शास्त्रात ऋतुचर्या म्हणजेच ऋतुनुसार आहार विहारात बदल करणे आवश्यक सांगितले आहे. ग्रीष्म ऋतुमधे रसापासून शुक्रापर्यंत सर्वच धातूंची स्निग्धता नष्ट होते. त्यामुळे आहारात त्यानुसार बदल करणे गरजेचे आहे.

काय घ्यावे आहारात –

मातीच्या भांड्यात ठेवलेले साखर घातलेले थंड असे सरबत मंथ घ्यावे. उदा. लिंबाचे सरबत, कोकम सरबत, गुलकंद घातलेले जल, वाळ्याचे पाणी इ. शरीरात थंडावा आणणारे फळांचे रस, नारळ पाणी, उसाचा रस इ. सेवन करावे. अन्नदेखील मधुर थंड पातळ असावे. सातूचे पीठ, सूप, दूध भात, तूप यांचा समावेश असावा. कोहळा (पांढरा भोपळा), दूधी, गिलके, सुरण धणे पुदीना, काकडी, मोसंबी, आंबा, आमसूल, मोरावळा या द्रव्यांचा आहारात समावेश करावा. श्रीखंड, रायता, पंचसार (मध खजूर मनुका फालसा साखर पाणी यांचे मिश्रण) आहारात घ्यावे. रात्री थंड म्हशीचे दूध घ्यावे. विहार म्हणजे रोजच्या जीवनात काही बदल करणे आवश्यक आहे. सुगंधी फुले जवळ ठेवणे किंवा चंदनाचा टिका लावणे, सुती सैलसर कपडे घालावे.

काय करू नये – या ऋतुत मद्यपान करू नये. मद्यपानाने शोष पडतो. दाह होतो. उन्हात हिंडणे, तिखट, खारट उष्ण पदार्थाचे सेवन करू नये. अति व्यायाम टाळावा. उष्णतेचे विकार उदा. घामोळ्या, मूत्रदाह, त्वचाविकार, ज्वर यापासून संरक्षण होण्याकरीता ऋतुचर्येत परिवर्तन करणे आवश्यक आहे. आयुर्वेद (Ayurveda) शास्त्राच्या या ऋतुचर्येचे मार्गदर्शन नक्कीच मदत करणारे आहे.

ह्या बातम्या पण वाचा : 

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button