सुमीत नागलला यूएस ओपनमध्ये थेट प्रवेश

Sumit Nagal

कोरोनामुळे (Corona) यंदाच्या युएस ओपनमध्ये बरेच खेळाडू भाग घेत नसल्याचा लाभ भारतीय टेनिसपटू सुमीत नागलला (Sumit Nagal) झाला आहे. सुमीत हा जागतिक क्रमवारीत 127 व्या स्थानी आहे. त्यामुळे पुरुष एकेरीच्या 128 खेळाडूंच्या मेन ड्रॉमध्ये सुमीत नागलला थेट स्थान मिळाले आहे. क्रमवारीत 132 व्या स्थानी असलेल्या प्रज्नेश गुनेश्वरनला मात्र स्थान मिळू शकलेले नाही.

ही बातमी पण वाचा:- 1999 नंतर टेनिसमध्ये असे प्रथमच घडतेय..

गेल्या वर्षी नागल हा पात्रता फेऱ्यांमधून युएस ओपनच्या पुरुष एकेरीत खेळला होता आणि पहिल्याच फेरीत त्याचा सामना ग्रेट राॕजर फेडररशी झाला होता. त्या सामन्यात फेडररविरुध्द एक सेट जिंकून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER