“गड आला पण सिंह गेला”; सुमीत राघवनचा उद्धव ठाकरेंना टोला

Uddhav Thackeray And Sumeet Raghvan

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पाडणार आहे. अभिनेता सुमीत राघवनने ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘सत्ता आली पण पत्ता गेला’, असं म्हणत सुमीतने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

‘गड आला पण सिंह गेला, पण आज म्हणावं लागेल.. सत्ता आली पण पत्ता गेला, मातोश्री ते सिल्व्हर ओक’, असं ट्विट करत सुमीतने ‘बाळासाहेब ठाकरे’ असा हॅशटॅग वापरला आहे. एक मतदार म्हणून मला माझी फसवणूक झाल्यासारखं वाटत आहे, अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज ६ वाजून ४० मिनिटांनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. २० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील.