केजरीवाल हुकूमशाह असून RSS-भाजपाची बी टीम, दुटप्पी आणि कपटीही; आमदाराचे आरोप

नवी दिल्ली : आमदार सुखपाल सिंग खैरा (Sukhpal Singh Khaira) यांनी AAPला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी AAPमध्ये जाणे चूक झाल्याचे सांगत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केले. ‘अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हुकूमशाह असून आसएसएस-भाजपाची (RSS-BJP) बी टीम आहे.’ असे सिंग यांनी म्हटले आहे.

“२०१५मध्ये आपमध्ये प्रवेश करणे ही फार मोठी चूक होती. केजरीवाल भारताच्या राजकारणात गुणात्मक बदल आणतील, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण सोबत काम केल्यानंतर अरविंद केजरीवाल दुटप्पी आणि कपटी असल्याचे लक्षात आले, असा गंभीर आरोप करताच केजरीवालांनी जम्मू आणि काश्मीरला नष्ट करण्यासाठी भाजपाला मदत केली. ते नेहमीच संघराज्यवादाविरोधात काम करतात. त्यांची अल्पसंख्याक विरोधी मानसिकता आहे. सीएए आणि युएपीएला समर्थन कृंत त्यांनी ते दर्शवले आहे. काँग्रेस हे एकमेव व्यवहार्य व्यासपीठ आहे.” असे सिंग यांनी सांगितले.

सुखपाल सिंग यांच्यासह आपचे आमदार जगदेवसिंग कमलू आणि पिरमलसिंग खालसा यांनीही पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या तीन आमदारांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला बळ मिळेल, अशी आशा अमरिंदरसिंग यांनी व्यक्त केली आहे.

आपचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष भगवंत मान म्हणाले की, सुखपाल सिंग लोकांचे हितकारक असल्याचे भासवत होते. पंजाबविरोधी पक्षासोबत उभे राहून सुखपाल यांनी आपला हेतू स्पष्ट केला आहे, अशी टीका त्यांनी केली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button