केलेल्या कामांचा हिशोब मांडूनच पुढील निवडणुकीला सामोरे जायचे – सुजय विखे

अहमदनगर : ‘जी काही कामे करायची ती चार वर्षांतच करायची. शेवटच्या वर्षी एकाही कामाचे भूमिपूजन करायचे नाही. केलेल्या कामांचा हिशोब मांडून पुढील निवडणुकीला सामोरे जायचे,’ असा निर्धार भाजपचे (BJP) खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

सुजय विखे म्हणाले, कोरोनामुळे (Corona Virus) सगळे संदर्भ बदलले आहेत. नगर जिल्ह्यात रस्त्याची अनेक कामे मार्गी लागली आहेत. या कामांसाठी राज्य सरकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे होता होईल तेवढा केंद्रातून निधी आणून ही कामे मार्गी लावली आहेत. असे विखेंनी सांगितले.

तसेच, गेल्या निवडणुकीत आपण दिलेली बहुतांश आश्वासने पूर्णत्वाकडे आली आहेत. उरलेलीही मार्गी लावणार आहोत. मात्र, आपण ठरविले आहे की जी काही कामे करायची ती पहिल्या चार वर्षांतच करून घ्यायची. उगीच मतांचे गणित डोळ्यासमोर ठेवून शेवटच्या वर्षी देखावा करण्यासाठी भूमिपूजन करायचेच नाही. पुढील निवडणुकीला सामोरे जाताना मागील कामांचा हिशोब मांडून जायचे. आता मतदार हुशार झाले आहेत. त्यांना खोटी आश्वासने आणि कामाचा देखावा लगेच लक्षात येतो. जे करायचे मनापासून करायचे, असे आपण ठरविले आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले.

तसेच, विखे पाटील म्हणाले की, ‘राज्य सरकारच्या निधीतून होऊ शकणारी कामेही रखडली आहेत. त्यासाठी आता आपण केंद्रीय निधीतून प्रयत्न करणार आहोत. यासाठी दर तीन महिन्याला एका केंद्रीय मंत्र्याला मतदारसंघात आणण्याचा आपला प्रयत्न आहे. एप्रिल महिन्यात मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथसिंह यांच्यापासून याची सुरुवात होणार असल्याचे विखेंनी सांगितले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक खासदार आपल्या मतदारसंघात पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल आणि आपल्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल माहिती देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER