सुजय विखे पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम, मतदार संघासाठी विशेष विमानाने आणले रेमडिसिवीर

Maharashtra Today

अहमदनगर : सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा(Corona) कहर बघायला मिळत आहे. दररोज रूग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत असल्याने औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच कोरोनाच्या उपचारात महत्वाच्या ठरत असलेल्या रेमडिसिवीर इंजक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रेमडिसिवीर इंजक्शन मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र अहमदनगरचे भाजप खासदार डॉ सुजय विखे (Sujay Vikhe Patil)यांनी जे सरकारला नाही जमलं ते करुन दाखवलं आहे. सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता विशेष विमानाने थेट दिल्लीवरुन रेमडिसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा आपल्या मतदार संघातील रूग्णांसाठी आणला. सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन तब्बल १० हजार रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला (10,000 Remedicivir brought by special plane for the constituency) आणली.

दोन दिवसापूर्वी सुजय विखे यांनी हा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. त्यानंतर त्यांनी आज सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती जाहीर केली. ‘ही इंजेक्शन्स सर्व लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस उशिरा हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती, असं सुजय विखे पाटील म्हणाले.

माझ्या कुवतीनुसार जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण घालू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहोत, असं सुजय विखे म्हणाले. हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही, असं सुजय विखे म्हणाले. मी फॅक्टरीत गेलो, तिथे मी माझ्या मैत्री संबंधांचा वापर केला, मदत घेतली आणि ही औषधं घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही. खासगी विमानाने ही औषधं आणतोय. माझ्या मनात पाप नाही, त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असेही सुजय विखेंनी ठणकावून सांगितले.

 

 

ही बातमी पण वाचा : अत्यावश्यक सेवेतील सर्वांना मोफत सेवा देणाऱ्या रिक्षाचालकाचे रोहित पवारांकडून कौतुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button