प्रचार मुलाचा, पण विखे पाटील म्हणतात, मी काँग्रेसमध्येच

प्रचार मुलाचा, पण विखे पाटील म्हणतात, मी काँग्रेसमध्येच

Moreshwar-Badgeविधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडलेली नाही. ते भाजपमध्येही ते गेलेले नाहीत. पण काँग्रेस सोडून भाजपचे अहमदनगरचे लोकसभेचे तिकीट मिळवणाऱ्या डॉ. सुजय ह्या आपल्या मुलाचा ते बिनधास्त प्रचार करीत आहेत. पक्ष त्यांना रोखत नाही आणि स्थानिक कार्यकर्तेही दुर्लक्ष करीत आहेत.

नगरजवळील राहुरी गावातल्या एक बंगल्याच्या आवारात प्रचाराची खासगी बैठक करताना एका माध्यमाच्या प्रतिनिधीला विखे पाटील रंगेहाथ सापडले. प्रतिनिधीने त्यांना हटकले असता, विखे म्हणाले, ‘मुलाचा बाप म्हणून मी बैठक करतो आहे. हायकमांडला मी माझी भूमिका मागेच कळवली आहे. मी काँग्रेसमध्येच आहे.’

ही बातमी पण वाचा : बिग फाईट; राजनाथशी लढणार पूनम सिन्हा

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाचा नेताच भाजपचे काम करीत असल्याची काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया आहे. पण आपण त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही असे खुद्द प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचा एक नेता म्हणाला, राधाकृष्ण यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांचे वैर जगजाहीर होते. राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा मुलासाठी शरद पवारांनी सोडली नाही याचा राग विखे पाटलांना आहे. त्या रागातून विखे पाटील शरद पवारांवर हल्ला करतात. भाजपचा प्रचार करीत नाहीत, असा युक्तिवाद विखेंचे समर्थक करीत आहेत. पण राधाकृष्ण विखे यांना काँग्रेसने दिलेली ही सवलत उद्या विधानसभेत बंडखोरांच्या पित्यांनी मागितली तर मिळेल काय? असाही सवाल या निमित्ताने पुढे येणार आहे.

ही बातमी पण वाचा : सुजय विखेंचा सोशल मिडियावर अपप्रचार; विखेंनी केली कारवाईची मागणी

२३ मे रोजी मतमोजणीनंतर निकाल हाती येतील. त्या नंतरच विखेंवर कारवाईचा हायकमांड निर्णय करू शकते. तो पर्यंत तरी त्यांना अभय आहे.