मुख्यमंत्री फडणवीस आणि माझ्यात लागली होती पैज- सुजय विखे

CM Fadnavis,Sujay Vikhe

अहमदनगर : राज्यात सुरुवातीपासूनच प्रतिष्ठेची मानली जाणारी निवडणूक खरोखरच चुरशीची लढत झाली आहे. अहमदनगरच्या लढतीत भाजपच्या सुजय विखेंनी तब्बल एक लाखाहून अधिक मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना मागे टाकले आहे.

आपण आघाडीवरच राहणार होतो हा विश्वास होताच. मुख्यमंत्री फडणवीस आणि माझ्यात पैज लागली होती.  ती पैज आज मी जिंकताना स्पष्ट दिसतंय,  अशी माहिती डॉ. सुजय यांनी दिली.

मी राज्यात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन निवडून येईन, अशी पैज मी मुख्यमंत्र्यासोबत लावलीय, असं ते म्हणाले.

दरम्यान, नगर दक्षिणचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. सुजय विखे मोठ्या मताधिक्याकडे वाटचाल करत आहेत. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप पराभवाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो.

सकाळी ८ वाजल्यापासून अहमदनगर येथील एमआयडीसी येथील वखार महामंडळात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी झाली. दहाव्या फेरीअखेर डॉ.सुजय विखे यांना २ लाख ८७ हजार ६६५ हजार तर आमदार संग्राम जगताप यांना १ लाख ७२ हजार ५४३ मते मिळाली आहे. एकूण ४ लाख २५ हजार ५७९ एवढ्या मतांची मोजणी झाली. आतापर्यंतच्या मतमोजणीत डॉ. विखेंनी मतांचा मोठा आकडा गाठला आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा : http://bit.ly/LoksabhaResults