सुजय विखेंनी मतदार संघासाठी आधी दिल्लीहून रेमडेसिवीर आणले, आता दुसरी मोहीम

Sujay Vikhe-Patil

अहमदनगर : मतदार संघातील कोरोना (Corona) रुग्णांसाठी भाजप (BJP) खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी दिल्लीहून विशेष विमानाने रेमडेसिवीर आणल्यानंतर आता आणखी एक मोठं काम हाती घेतलं आहे. त्यांनी कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळ नगरमध्ये कोरोनाविरोधातील लढ्याला आणखी बळ मिळणार आहे.

सध्या राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. ऑक्सिजन अभावी शेकडो रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यालासुद्धा मागील काही दिवसांपासून ऑक्सिजन तुटवड्याचा सामना करावा लागतोय. याच गोष्टीची दखल घेत डॉ. सुजय विखे यांनी तब्बल दीड कोटी रुपयांचा ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे अत्यंत कमी काळात म्हणजेच येत्या १० दिवसांत या प्लांटमध्ये ऑक्सिजन निर्मिती होणार आहे.

अहमदनगरमधील ऑक्सिजनची कमतरता पाहून सुजय विखे यांनी जिल्ह्यात मोठा ऑक्सिजन नजरेटर प्लांट उभारण्याचं घोषित केलं आहे. तसेच हा फ्लांट भारतातील पहिला आटोमॅटिक ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट असणार आहे. ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याने सुजय विखे यांनी हा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button