
रत्नागिरी : खेड तालुक्यातील मोरवडे मोदगे वाडी येथील अंगणवाडीत क्वांरटाईन केलेल्या ६० वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अनंत भुवड असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. २२ मे ते १९ जून या कालावधीसाठी या प्रौढास गावातील अंगणवाडी येथे क्वांरटाईन करण्यात आले होते. या प्रौढाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. या प्रौढाने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही,
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला