बलात्कारामुळे व्यथित १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची

Minor Girl Commited Suicide After Rape

चंद्रपूर :- बलात्कारामुळे (Rape) व्यथित झालेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात घडली आहे .

माहितीनुसार, पीडित मुलगी दुपारच्या सुमारास स्वतःच्या शेताकडे पिकांना पाणी देण्यासाठी निघाली. मात्र याच वेळी आरोपी मंगेश दिवाकर मगरे (२७) व अजय मुरलीधर नन्नावरे (२०) यांनी तिचा पाठलाग केला. शेतावर गेल्यावर तिच्यावर दोघांनी बळजबरीने अत्याचार केला. हे कृत्य सहन न झाल्यामुळे पीडित मुलीने शेतात एका कागदावर घडलेला सर्व प्रकार चिठ्ठीत लिहून ठेवला व शेतालगतच्या कुशाब बारेकर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सायंकाळी आई घरी आल्यावर मुलगी घरी व गावात कुठेही दिसत नाही म्हणून रात्री शेतावर शोध घेतला. तेव्हा शेताच्या पाळीवर एका ठिकाणी फावड्याखाली मुलीने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीवरून मुलीने काहीतरी बरेवाईट केल्याचा संशय आल्याने जवळच्या विहिरीत गळ टाकून शोध घेण्यात आला. विहिरीत शोध घेतला असता पीडित मुलीचा मृतदेह हाती लागला. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर चिठ्ठीत नमूद दोन युवकांविरुद्ध नागभीड पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. नागभीड पोलीस स्टेशनमध्ये आरोपींवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी नागभीड गाठून तपासावर लक्ष ठेवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER