नैराश्यातून मजूराची आत्महत्या

Suicide

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे अशक्य होत असल्याने मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. माधव शामजी बासनवाळ (३२, रा. लालमाती, भावसिंगपुरा) असे मृत मजूराचे नाव आहे. लॉकडाऊनच्या काळात काम मिळत नसल्याने उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. या नैराश्यातून विवाहित मजूर माधव बासनवाळ याने मध्यरात्री छताच्या लाकडी फळीला दोरीने गळफास घेतला. हा प्रकार समोर येताच त्याला बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास जमादार शेख हसीना करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER