अहमदनगर येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला मदत करणार – विजय वडेट्टीवार

Suicide farmers in Ahmednagar-Vijay Vadettiwar

नागपूर : शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून तिसरीतल्या एका मुलाने कविता रचली आणि शाळेत सादर केली; पण दुर्दैवाची बाब म्हणजे मुलाने कविता सादर केल्याच्या दोन तासांनंतरच शेतकरी असलेल्या वडिलाने आत्महत्या केल्याची काळीज पिळून टाकणारी घटना अहमदनर येथे घडली. या घटनेनंतर कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याची आत्महत्या केल्याची घटना दुःखद आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला मदत करणार अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच दोन लाखांपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होत आहे. एन.पी.ए झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा मिळत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र ही अफवा असून शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये, कर्जमाफीचा फायदा होणारे शेतकरी एनपीए झालेले आहेत. पुढील तीन महिन्यात दोन लाखांपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

मुलाकडून शाळेत ‘बळीराजा नको करू आत्महत्या’ कविता सादर; दोन तासांनी वडिलाची आत्महत्या