गोळी झाडून घेत आत्महत्या, APMC पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Bhushan Pawar

नवी मुंबई : APMC सहायक पोलीस निरीक्षक भूषण पवार (Bhushan Pawar) यांनी शासकीय रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पोलीस ठाण्यातच पवार यांनी स्वत:वर गोळी झाडली. त्यानंतर पवार यांना MGM रुग्णालयात हलवण्यात आले. पण दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पवार यांचा आत्महत्येचे नेमके कारण काय? हे अद्यापही समझले नाही. दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात आपल्या दालनातच त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. भूषण पवार हे ४२ वर्षांचे होते. एक वर्षापासून APMC पोलीस ठाण्यात ते सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. आत्महत्येच्या या घटनेमुळे पोलीस दलाला धक्का बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER