मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

Suicide Attempt in mantralay

मुंबई : दिव्यांग, अपंग कायम विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यास  राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ दोन शाळाचालक कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी मंत्रालयात दुसऱ्या  मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.  मंत्रालयाच्या व्हरांड्यात जाळ्या  बांधलेल्या असल्याने ते बचावले.

याची जळगावचे हेमंत पाटील , उस्मानाबादचे अरुण नेटोरे असे  उडी मारलेला  शाळा चालकाचे नांव आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

राज्यात दिव्यांग, अपंगाच्या कायम विनाअनुदानित 300 वर शाळा आहेत, गेल्या 10, 12 वर्षांपासून काम करीत आहेत,  मात्र त्यांना काहीही अनुदान मिळत नाही, त्यासाठी यावर काम करीत असलेल्या 4, 5 शाळाचालकाचे प्रतिनिधी गेल्या तीन दिवसापासून मंत्रयालयात शिक्षणमंत्री व अधिकाऱ्याना भेटण्यासाठी आले होते.  मंगळवारी  शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेवेळी  त्यांना पुढच्या अधिवेशनावेळी प्रस्ताव मांडू, असे आश्वासन दिले होते, त्यानंतर बुधवारी ते परत मंत्रालयात अधिकाऱ्याशी चर्चा करण्यासाठी आले   होते, मात्र त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही., त्यामुळे त्यांनी निराश होऊन सायंकाळी पाचच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील  सरकत्या जिन्याजवळ  येवून शासनाच्या निषेधाच्या घोषना देत  जाळ्यावर उड्या मारल्या. दोघे  जाळीवर पडून घोषणा देत होते. पोलिसांनी त्यांना बाहेर काढले आहे दोघांची जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.