सुहेल शर्मा यांची बदली; दीक्षितकुमार गेडाम सांगलीचे नवे एसपी

दीक्षितकुमार गेडाम

सांगली : सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी दीक्षितकुमार गेडाम ( Dixit Kumar Gedam) यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी रात्री गृह विभागाने दिले आहेत. मावळते पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा (Suhail Sharma) यांची बदली झाली आहे. मात्र, त्यांना अजून नियुक्ती देण्यात आलेली नाही.

२०१७ मध्ये सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळे खून झाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी शर्मा यांची सांगलीच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी ते कोल्हापूर येथे अतिरिक्त अधीक्षक म्हणून कार्यरत होते. शर्मा यांनी कार्यभार घेतल्यानंतर कोथळे खूनप्रकरणाने पोलीस दलाची डागाळलेली प्रतिमा पुसण्याचे काम केले.

शर्मा यांनी महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. पीए सिस्टीम, नागरी सुविधा केंद्र, पोलीस मदत केंद्र, ई-पासपोर्ट यासह पोलीस दलाचे आधुनिकीकरण केले. जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढत २० हून अधिक टोळ्यांवर ‘मोका’ची कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER