कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शरद पवारांनी केल्या काही सूचना

suggestions by Sharad Pawar to prevent Corona outbreak

मुंबई :- मुंबई-पुण्यासारखी शहरे ‘लॉकडाऊन’ असूनही महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. पुण्यात आणखी ३ रुग्ण सापडल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा १०१वर गेला आहे. त्यामुळे आता लोकांनी स्वतःहून काळजी घेण्याची गरज असून, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून काही सूचना केल्या आहे.

कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी करू. सोबतच्या तक्त्यात सांगितलेल्या गोष्टींची खबरदारी घ्या. आपण कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकू शकतो. #StayHomeStaySafe WarAgainstVirus असं ट्विट त्यांनी केलं आहे.


Web Title : Suggestions by sharad pawar to prevent corona outbreak

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)