ऊसतोड कामगारांचे प्रश्न : … धनंजय मुंडेंची जबाबदारी निश्चित करा – पंकजा मुंडे

Pankaja Munde - Dhananjay Munde

बीड : ऊसतोड कामगार महामंडळाकडे असणारे विषय हाताळण्यासाठी कमिटीने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही बैठकीला बोलवा आणि जबाबदारी निश्चित करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली.

त्या आज झालेल्या साखर संघाच्या बैठकीत बोलत होत्या. बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने झाली. ऊसतोड कामगारांना सन्मानजनक वाढ द्या, वाढ देण्यात येत नाही तोपर्यंत ऊसतोड कामगारांचा कोयता चालणार नाही, असा इशाराही पंकजा मुंडे यांनी दिला.

बैठकीत राज्यात सुरू असलेल्या ऊसतोड कामगारांच्या संपातील मागण्यांवर चर्चा झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनाही आमंत्रित करावे व अंतिम निर्णय लवादाने घ्यावा, अशा सूचना पंकजा मुंडेंनी केल्या. ऊसतोड कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठीच्या बैठकीला धनंजय मुंडे यांनाही बोलावून त्यांच्यावर ही जबाबदारी देण्याची मागणी पंकजा यांनी केली.

ऊसतोड मजुरांना सन्मानजनक वाढ द्या अन्यथा कोयता चालणार नाही!!! करार ३ वर्षाचाच होईल .. covid च्या धरतीवर मजुरांना विमा कवच द्या सरकारने व कारखान्याने ही जवाबदारी घ्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

ऊसतोड कामगार महामंडळा कडे असणारे विषय हाताळण्यासाठी धनंजय मुंडे ना ही बैठकी ला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. सरकार पातळीवर आणखी मंत्री महोदय उदा.आरोग्य मंत्री, कामगार मंत्री, महिला व बाल कल्याण यांनाही बोलवावे.

लवादाच्या बाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय खा.शरद पवार यांचे मार्गदर्शन घ्यावे. संप मजुरांच्या हक्कासाठी आहे कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही. माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत, असे ट्विट पंकजा यांनी केले.

सरकार पातळीवरील विषय चर्चा करण्यासाठी एक आणि भाववाढ व कोविड सुरक्षा यावर चर्चा करणारी एक अशा दोन कमिटी साखर संघाने कराव्या, साखर संघाचे अध्यक्ष दांडेगावकर यांनी त्या कॉमिटींचे अध्यक्ष असावे. या दोन्ही या कमिटींनी त्यांचे म्हणणे लवादा समोर मांडावे व चर्चा करावी. अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER