ऊस तोडणी मागणी प्रश्नी वाटाघाटी फिस्कटल्या

ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटन

पुणे : ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी पुणे येथील साखर संघाच्या कार्यालयात आज बैठक झाली. बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. मागण्या मान्य न झाल्याने ऊसतोडणी कामगारांचा संप सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव (Subhash jadhav) यांनी स्पष्ट केले.

कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी, कोरोना विमा संरक्षण व प्रत्येक कारखान्यावर उपचार केंद्र आणि ऊस तोडणी व वाहतूक दरवाढीचा निर्णय झाल्याशिवाय कोयता हातात धरणार नाही, गाव सोडणार नाही असे तोडणी कामगारांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितले. ऊस तोडणी (Sugarcane) कामगारांच्य मागण्याबाबत साखर संघाने समिती नेमली होती. तोडगा काढण्याच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे संघाने ऐकूण घेतले. पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेण्याचे ठरले. बैठकीसाठी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष आबासाहेब पाटील व श्रीराम शेटे, आमदार प्रकाश आवाडे, हर्षवर्धन पाटील, अरुण लाड, कार्यकारी संचालक संजय खताळ उपस्थित होते. तर संघटनांच्या वतीने प्रा. आबासाहेब चौगले, जीवन राठोड, केशवराव आंधळे, दत्तू भांगे, श्रीमंत जायभावे, मोहन जाधव, सुशिला मोराळे,प्रदीप भांगे यांनी सहभाग घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER