पेट्रोलच्या वाढत्या दरावर उपाय आहे ऊसाचा आणि मक्क्याचा ! वाचा का?

Maharashtra Today

इंधनाशिवाय माणसाचं आयुष्य कसं असेल याची कल्पना करणं आज अशक्य बनलंय. आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडणारी बरीच साधनं इंधनावर अवलंबून आहेत. यापैकी सर्वात जास्त ‘पेट्रोलियम'(Petrolium)पासून बनलेलं इंधन आपण वापरत आहोत. पेट्रोलियम पदार्थ संपल्यानंतर जगाचं चित्र अधिक भयानक असेल. सर्वात आधी वाहतूकीवर परिणाम होईल. अन्नधान्य, भाजीपाला, दुध वगैरे पदार्थ त्या ठिकाण पोहचणार नाहीत. शहरात अधिक भीषण परिस्थीती निर्माण होईल.

यानंतर प्लॅस्टीक(Plastic) उत्पादनांवर याचा थेट परिणाम होईल. वर्षानूवर्षापासून बनणाऱ्या टुथपेस्ट, बुटं, कपडे, मेडीकल उत्पादनं इत्यादी गोष्टी पेट्रोलियमपासून बनतात. इंधन संपल्यानंतर या गोष्टी बननं बंद होतील. संपूर्ण जगावर अंधाराचं साम्राज्य प्रस्थापित होईल. वीज बनवण्यासाठीही इंधन मिळणार नाही. यामुळं सर्व पावर प्लांट बंद होतील. इंधन संपल्यानंतर इतक्या भयानक पद्धतीने माणसाचं आयुष्य बदलू शकतं.

बायो फ्यूल ठरु शकतं उपाय

बायोफ्यूलचा वापर आजकाल सुरु झाल्याचा तुमचा समज चुकिचा आहे. अनेक वर्षांच्या आधीपासून याचा वापर सुरु आहे. फॉर्ड कंपनीनं पहिल्यांदा यावर काम करत इथॅनोलवर चालणारी गाडी बाजारात आणली होती. शिवाय सुरुवातीच्या काळात डिझेल इंजीनसुद्धा बायोफ्यूललवर काम करायचे. नंतरच्या काळात पेट्रोलची मागणी पुर्ण होऊ लागल्यामुळं बायोफ्यूलकडं संपूर्ण जगाच दुर्लक्ष झालं. एखादा व्यक्ती स्वतः हे इंधन निर्माण करु शकतो. बायोफ्यूल बनवण्यासाठी निसर्ग आपल्या उपयोगी पडतो. पेट्रोल आणि डिझेल एकदा संपले तर परत त्यांची निर्मिती करता येणं अशक्य आहे तर दुसऱ्या बाजूला बायो फ्यूल वारंवार बनवणं सहज शक्य आहे. पेट्रोल डिझेल बनण्यासाठी करोडो वर्षांचा कालवधी लागतो तर दुसऱ्या बाजूला एखाद्या प्रयोगशाळेत बायोफ्यूल बनवणं शक्य आहे.

बायोफ्यूपैकी सर्वात प्रसिद्ध इंधन म्हणून इथेनॉल जगभरता प्रसिद्धीस पावलं आहे. इथेनॉलने जगाला त्याच्याकडे आकर्षित केलंय. पेट्रोल डिझेलच्या जागी याचा आरामात वापर करणं शक्य आहे. इथेनॉल काही खास नाहीये. दारु बनवण्याच्या प्रक्रिये प्रमाणेच इथॅनोलवर प्रक्रिया केली जाते. दोन्हीतही प्रक्रिया केलेल्या मक्क्याचा वापर केला जातो. फरक इतकाच आहे की दारू पिण्यायोग्य आहे इथॅनोल नाही. सामान्यपणे बायोफ्यूल बनवण्यासाठी रासायनिक प्रक्रिया, स्टार्च, साखर, आणि वनस्पती इत्यादी एकमेकांसोबत मिळवले जातात. मोठ्या उष्णतेवर तापवल्यानंतर बायोफ्यूल बनायला सुरुवात होते. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोक आपोआप बायोफ्यूलकडे आकर्षित होताना दिसत आहेत.

मार्ग सहज आहे पण सोप्पा नाही

बायोफ्यूल संपूर्ण जगाची इंधनाची भूक शमवू शकतो. परंतू याच्या वापरात मोठ्या अडचणीही आहेत. ज्याप्रमाणं एका नाण्याला दोन बाजू असतात तशाच पद्धतीनं बायोफ्यूलचे फायदे जितके आहेत तितकेच तोटे आहेत. इंधन वाचवणारं बायोफ्यूल संपुर्ण निसर्गासाठी घातक ठरु शकतं. बायोफ्यूल बनवण्यासाठी जीवंत झाडांचा उपयोग केला जातो. बायोफ्यूलची मागणी वाढली तर हे पीक बनवण्यासाठी बरेच लागवडीचे क्षेत्र वापरावे लागेल. शिवाय अन्नधान्याच्या पुर्ततेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यामुळं मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि जंगल तोड होऊ शकते. निसर्गाचा समतोल ढासळवण्यासाठी बायोफ्यूल उपयोगी पडू शकतं.

आजमितीला अमेरिका आणि ब्राझीलमध्ये जगभरातील ७० टक्के बायोफ्यूलचे उत्पादन घेतले जाते. अमेरिकेत बायोफ्यूल बनवण्यासाठी मक्क्याचा तर ब्राझीलमध्ये ऊसाचा वापर केला जातो. शिवाय चीन, थायलंड, फ्रान्स, कॅनडा इत्यादी देशांमधून याचे उत्पादन सुरु करण्यात आलंय. आपलं भविष्य वाचवण्यासाठी बायोफ्यूल गरजेचं असलं तरी भारतात या विषयी गंभीरतेने पावलं उचलणे गरजेचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button