१५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांची धुरांडी

Sugar Factory

मुंबई : मागील वर्षी महापूर, पाऊस, विधानसभा निवडणुका यामुळे गळीत हंगाम लांबला होता. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे (Corona) मोठे संकट गळीत हंगामावर आहे. वाढलेले ऊसक्षेत्राचा विचार करता मंत्री गटाने १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील सुमारे १८० कारखाने उस गाळप करतील असा अंदाज आहे.

मागील वर्षी विधानसभा निवडणूकीनंतर लगेचच असणारी दिवाळीमुळे (Diwali) ऊस गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाला होता. पश्चिम महाराष्ट्रासह उस पट्ट्यात अजूनही मुसळधार पावसामुळे गळीत हंगाम त्यापुढेही लांबला होता. महापुराने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ऊसाचे उत्पादन घट होवून हंगामही सरासरीपेक्षा लवकर संपला होता. मात्र, यंदाच्या वर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने ऊस पिक दमदार आहे. कोरोना महामारीचे संकट यंदाच्या हंगामावर आहे. सततच्या पावसामुळे शेतात अध्याप घात नाही. यापार्श्वभूमीवर १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगामास परवानगी दिली असली तरी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पूर्ण क्षमतेने हंगाम सुरु होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

साखर कारखान्यांना साधारणपणे १ ऑक्टोंबरपासून गळितास परवानगी दिली जाते.

परंतू ऑक्टोंबरमध्ये पडणारा मान्सूनचा परतीचा पाऊस आणि याच दरम्यान येणारा दसरा व दिवाळीचा सण यामुळे कारखानदार नोव्हेंबरपासूनच नवा हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे परजिल्हयातून येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्या येण्यास कोरोणामुळे उशीर लागणार आहे. कोरोनामुळें हंगाम लांबेल शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER