सॅनिटायझर उत्पादनातून साखर कारखानदारांचे उखळ पांढरे

Sugar Factory - Sanitizer

कोल्हापूर : कोरोना (Corona) संसर्गामुळे सॅनिटायझरला (Sanitizer) मागणी वाढत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यभरातील बहुसंख्य सहकारी तसेच खासगी साखर कारखानदारांनी अल्कोहोल किंवा इथेनॉलपासून सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले आहे. यातून साखर कारखानदारांना तब्बल 45 हजार कोटींचे उत्पादन मिळेल असा अंदाज आहे. राज्यभरातील एखादा अपवाद वगळता बहुसंख्य कारखाने सॅनिटायझरचे उत्पादन करीत आहेत.

सन 2019-2020 च्या गळीत हंगामात राज्यभरातील सहकारी आणि खासगी अशा 205 साखर कारखान्यांनी मिळून सात कोटी 30 लाख टन उसाचे गाळप केले. सामान्यत: एक टन उसापासून 40 किलो मळी अथवा 27 लिटर मध्यम ते उच्च प्रतिचे अल्कोहोल मिळते. या गाळप उसापासून 27 लिटरप्रमाणे कारखान्यांना तब्बल 197 कोटी 1 लाख लिटर अल्कोहोलचे उत्पादन मिळाले. 1200 रुपये प्रतिलिटर प्रमाणे कारखान्यांना 1 लाख 18 हजार 260 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. यातील किमान निम्म्याहून अधिक अल्कोहोल हे थेट देशी विदेशीच्या माध्यमातून विकले जाते. त्यामुळे उर्वरित निम्म्या अल्कोहोलपासून कारखान्यांना तब्बल 45 हजार कोटींचे थेट उत्पन्न मिळू लागले आहे. य यानिमित्ताने ऊसउत्पादक या उत्पन्नातील काही तरी वाटा मिळावा, अशी अपेक्षा करतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER