मुख्यमंत्री झाले तरी, कपाळावरील शिवधनुष्याचे तेज, चेह-यावरचा कमळाचा टवटवीतपणा नसून घडाळ्याच्या बंद काट्याचे भाव स्पष्ट दिसत आहेत – सुधीर मुनगंटीवार

sudhir-uddhav

विधानसभेत भाषण करताना माजी अर्थमंत्री, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना भाजपच्या नात्याला चक्क थ्री इडियट्स मधल्या करिना कपूर आमिरखानची उपमा दिली आणि सभागृहात एकच हशा झाला.


नागपूर :- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस भाजप शिवसेनेच्या संबंधाची पावती देणा-या भाषणांवर गाजला. शिवसेनेने धोका दिल्यामूळेच भाजप सत्तेपासून दूर राहील्याची सल भाजप नेत्यांमध्ये अद्यापही आहे. हे भाजप नेत्यांच्या कालच्या भाषणांमधूून स्पष्ट जाणवत होते.

माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिदूत्वाची आठवण करून देतांना, तसेच बाळासाहेबांनी कशाप्रकारे कॉंग्रेसवर टीका केली होती ते फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून ते ‘सामना’मधील मथळे वाचून दाखण्यापर्यंत अनेक पद्धतीने फजडणवीसांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. त्यांच्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनीही आपल्या भाषणामधून शिवसेना सोबत नसल्याची सल सौम्य भाषेतून, कवीतेतून बोलून दाखवली.

आमिर खानच्या थ्री इडियट्स सिनेमातील एका सिनचं उदाहरण देताना मुनगंटीवार म्हणाले, सिनेमाच्या शेवटी थ्री इडियट्स मधली करिना कपूर जशी परत येते तसंच शिवसेना भाजपदेखील एकत्र येऊ असे म्हमाले आणि सभागृहात एकच हशा झाला. तसेच त्यांनी जगाच्या पाठीवर या सिनेमाच्या उदाहरणांतूनही सेनेवर टीका करताना ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या गाण्याचा उल्लेखही आपल्या भाषणामध्ये केला.

वनमंत्री व जंगलाचा माझा संबंध असल्याचे सांगत, जसा एखाद्या मागे चकवा लागतो आणि ती व्यक्ती भानहरपून रस्ता जातो तिकडे पुढेपुढे जात असते. तसेच असाच चकवा जंगलातील वाघाला काजव्यांमुळे लागतो आणि चकव्यामुळे शिका-याला वाघाची शिकार करणे सोपे जाते. त्याप्रमाणे सेनेच्या वाघाची सध्या शिकार झाल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

त्याचप्रमाणे नागपूरच्या अधिवेशनाच्या दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री ठाकरे आणि श्रीमती रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे एकविरा मातेच्या दर्शनाला गेले होते. हाच धागा पकडून मुनगंटीवारांनी बाळासाहेबांनीही पहिल्यांदा शिवसेना भाजपची सत्ता आल्यानंतर एकविरा मातेचं दर्शन घेतल्याची आठवण सभागृहात सेनेला करून दिली.

1995 चा दाखला देत 95 साली जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची पहिल्यांदा सत्ता आली होती त्यावेळी बाळासाहेबांनी एकविरा मातेचं दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांनी कॉंंग्रेसला फुंकून टाकणार अशी शपथ घेतली होती. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेदेखील पुन्हा एकदा एकवीरा मातेच्या दर्शानाला जाणार तेव्हा बाळासाहेबांची प्रतिज्ञा पूर्ण करणार असल्याचे खोचक विधान केले.

उद्धव ठाकरे भाजप सोबत हिंदुत्वाची लढाई लढताना त्यांच्या कपाळावर शिवधनुष्याचे तेज होते. चेग-यावर कमळाचा टवटवीतपणा होता. मात्र, आता ते मुख्यमंत्री झाले असतानादेखील त्यांच्या चेह-यावर ते तेज नाही तर बंद घड्याळाचे भाव दिसत आहेत असा टोलाही मुनगंटीवारांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.

तसेच, बाळासाहेबांनी सावरकरांवर अपशब्द बोलणा-या मनिशंकर अय्यर यांच्या थोबाडात चप्पल हाणली होती याचाही दाखला मुनगंटीवारांनी भाषणात दिला. आता त्याच्यांचसोबत सेनेनी हातमिळवणी केल्याची सलही त्यांनी बोलून दाखवली. परंतू बाषणात शेवटी त्यांनी आम्ही थ्री इडियट्समधील करिना कपूर प्रमाणे पून्हा एकत्र येणार असल्याचेही सांगितले. त्यांच्या या विधानाने सभागृह खळखळून हसले.