राठोडांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनालाही भीक घातली नाही ; मुनगंटीवारांची टीका

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोरोना (Corona Virus) नियमांचं पालन करा, गर्दी करू नका, अशा सूचना केल्या आहेत. पण ठाकरे सरकारमधील मंत्रीच आता गर्दी करून कोरोना नियमांची पायमल्ली करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला न जुमानता ते पोहरादेवीत येत आहेत. त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भीक घातलेली नाही. त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे हे एक प्रकारे शक्तीप्रदर्शन नसून मुख्यमंत्र्यांसाठीचं आव्हान प्रदर्शन आहे, असं मुनगंटीवार (Mungantiwar) म्हणाले. तसेच कोरोना नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते, वनमं६ी संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर गेले पंधरा दिवस ते नॉटरिचेबल होते. आज अखेर ते जनतेसमोर आले आहेत. पोहरादेवी येथे ते पत्नी आणि संपुर्ण ताफ्यासह दाखल झाले आहेत.

संजय राठोड यांनी पोहरादेवीत जी गर्दी केली त्यावरून मुनगंटीवार यांनी त्यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे तसेच, शक्तीप्रदर्शन म्हणजे निर्दोषत्त्व नाही असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

शक्तीप्रदर्शन म्हणजे निर्दोषत्त्व नाही –

निर्दोषत्वाचा संबंध नाही: संजय राठोड हे आज पोहरादेवीत शक्ती प्रदर्शन करत आहेत. त्यांनी शक्ती प्रदर्शन जरूर करावे. पण शक्तीप्रदर्शनाचा आणि निर्दोषत्वाचा काहीही संबंध नाही आणि नसतो, असं मुनगंटीवार म्हणाले. त्यांनी मीडियासमोर बोलण्यापेक्षा पोलिसांसमोर जाऊन आपली बाजू मांडावी, असा सल्लाही मुनगंटीवार यांनी दिला आहे.

तसेच, राठोड यांना कितीही क्लीन चिट दिली. आज त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर दोन-चार वर्षाने त्यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात कारवाई होणारच ना, असंही त्यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : संजय राठोडांनी पोहरादेवीजवळ सत्य बोलावं …

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER