शरीर स्वतःचं, पण मेंदूवर कंट्रोल दुसऱ्या कोणाचा; सुधीर मुनगंटीवारांची शिवसेनेवर टीका

Uddhav Thackeray-Sudhir mungantiwar

मुंबई :- भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वा. सावरकर यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असताना शरीर स्वतःचं पण मेंदूवर दुसऱ्या कोणाचा कंट्रोल आहे, असा घणाघात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी शिवसेनेवर केला आहे. तर स्वा. सावरकर यांच्या मुद्द्यावरून शिवसेना शांत कशी, असा सवालदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला .

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अनेकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आजही स्वा. सावरकरांना गौरव प्रस्ताव देण्याच्या मुद्द्यावरून सभागृहात बराच वादंग झाला . अशातच विधानसभा अध्यक्षांनी गौरव प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजप अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना गौरव प्रस्ताव फेटाळला गेल्याने शिवसेनेने खरेच हिंदुत्व सोडले आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे . दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीवरून शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट नाही, सत्तेत भागीदारी असलेल्या काँग्रेसची नाराजी शिवसेनेला घ्यायची नाही. काँग्रेसने वीर सावरकरांबद्दल नेहमी अपमानास्पद शब्दांचा वापर केला आहे. शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली होती. ब्रिटिशांची माफी मागणाऱ्यांना भारतरत्न का द्यायचा, असा सवाल काँग्रेसकडून विचारला जातो. त्यामुळे सावरकर मुद्द्यावरून शिवसेना-काँग्रेस यांच्यात मतभेद आहेत.

भाजपा आमदार सभागृहात घालून आले ‘मी पण सावरकर’ लिहिलेल्या भगव्या टोप्या


Web Title : Sudhir mungantiwar criticized uddhav thackeray shivsena

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)