शरद पवार साहेबांनी पण याच कायद्याच्या अनुषंगाने पत्र लिहिले होते : सुधीर मुनगंटीवार

sudhir mungantiwar-Sharad Pawar

मुंबई :- कृषी कायद्याच्या विरोधकांवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी निशाणा साधला. देशात झालेल्या विविध निवडणुका-पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे केंद्रातील विरोधी पक्ष हादरले आहेत. म्हणून आता शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे .

काँग्रेस नेत्यांना या कायद्याच्या विरोधात टीका करणाऱ्यांना राजकीय अलमायझर झाला आहे का? कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी तर संसदेत २०१३ ला जोरदार भाषण केलं होतं. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी पण याच कायद्याच्या अनुषंगाने पत्र लिहिले होते, असा प्रश्नदेखील मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.

जर केंद्राचा कायदा अडचणींचा वाटत आहे तर राज्यात तुम्हाला सोईचा होईल असा कायदा करा ना. आम्ही २०१४ नंतर राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले. त्यामुळे कुठे नुकसान झाल्याचं ऐकिवात नाही, असेदेखील त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांनीच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय असे म्हटले होते : मनसे नेत्याचा ट्विट करत निशाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER