
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना त्यांच्या जावयावरील एनसीबीच्या कारवाईवरून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. नवाब मलिक मंत्री आहेत म्हणून त्यांच्या जावयाने काहीही करावे का? असा थेट प्रश्न मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विचारला आहे. तसेच एनसीबीच्या कारवाईवर राजकारण करू नये, असेही त्यांनी सुनावले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हे आधीपासूनच फसवे आहेत. नवाब मलिक हे मंत्री आहेत, तर मग त्यांच्या जावयाने काहीही करावे का? कायद्यानुसार कारवाई होत असेल, तर त्यात राजकारण कशाला आणता? आरोप गंभीर आहेत तर त्या दृष्टीने तपास करून कारवाई व्हायलाच पाहिजे. याबद्दल आमच्या दोन्ही नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली. प्रत्येक वेळी विरोधाला विरोध करायलाच हवा का? पोलिसांना कारवाई करू द्या. त्यानंतर आम्ही बघू. भाजप विरोधक म्हणून कुठेही कमी पडत नाही. पक्षाच्या अंतर्गत वाद असतील, तर ते पडळकरांना जास्त माहिती असतील, कारण ते त्या भागात जास्त आहेत. पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे यावर फार काही बोलणार नाही, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला