ते वनमंत्री आहेत, करत असतील दाट वनात संशोधन; मुनगंटीवारांचा संजय राठोडांना टोमणा

Sudhir Mungantiwar criticised Sanjay Rathod

नागपूर : भाजपाचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना नागपूर येथे पत्रकारांनी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मुनगंटीवार यांनी राठोड बेपत्ता असल्याबद्दल टोमणा मारला – संजय राठोड कुठे गेलेत, हे मी सांगू शकत नाही. ते वनमंत्री आहेत, दाट वन शोधत संशोधन करत असतील!

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या (Pooja Chavan sucide case) प्रकरणानंतर १० दिवसांपासून संजय राठोड ‘नॉट रिचेबल’ आहेत. ते कुठे आहेत याबद्दल कोणीही माहिती देत नाहीत.

सुधीर मुनगंटीवार गुरुवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यपाल आणि महाविकासआघाडी सरकारमधील संघर्षाबाबत ते म्हणालेत, सरकारला विचारणा करण्याचा हक्क घटनेने राज्यपालांना दिला आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात सरकारला विचारणा केली.

सरकार कोर्टात जाऊ म्हटले पण तेवढी धमक नाही

ते म्हणालेत, हे पहिले सरकार आहे जे सांगते की आमचे राज्यपालांसोबत खुले युद्ध सुरू आहे. सर्वकाही स्वार्थासाठी सुरु आहे. १२ आमदारांच्या निवडीवरुन आम्ही कोर्टात जाऊ, असे सरकार सांगते. मात्र, सरकारमध्ये तेवढी धमक नाही.

दरम्यान, बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे संजय राठोड गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलणार असे सांगितले होते. मात्र, त्यांचा पोहरादेवी दौरा लांबणीवर पडल्याची माहिती बुधवारी मिळाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी दोन दिवसांपूर्वीच मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून दिला आहे. संजय राठोड हे विदर्भातील शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. त्यांना बंजारा समाजाचा मोठा जनाधार आहे. त्यामुळे शिवसेना अद्याप त्यांच्यासंदर्भात कोणताही निर्णय घेत नाही, अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER