सुधीर मुनगंटीवार यांनाही कोरोनाची लागण; स्वतः दिली माहिती

sudhir-munangatiwar-corona-positive

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून, अनेक राजकारण्यांना, नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातच आता राज्याचे माजी अर्थमंत्री तथा भाजपा (BJP) आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Munangatiwar) यांची कोरोना (Corona) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत त्यांनी स्वतःच ट्विट करून माहिती दिली. “माझा कोविड-१९ चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वतःला आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी, कोरोना चाचणी करून घ्यावी आणि क्वारंटाईन व्हावे, अशी मी विनंती करतो.” असे मुनगंटीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोरोना संकटामुळे विधानसभेचे पावसाळी अधिवेशनही दोन दिवसांतच आटोपते घेण्यात आले होते. मात्र, या अधिवेशनानंतर आमदारांना कोरोनाचा धोका वाढला आहे. सुधीर मुनगंटीवारांपूर्वी, आजच अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. याशिवाय त्यांची पत्नी नयना कडू आणि कुटुंबातील इतर १२ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कागलचे राष्ट्रवादीचे आमदार आणि ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा कोरोना अहवालही शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER