पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो आणि इतरांचे बालेकिल्ले ढासळले ; संजय राऊतांचा भाजपला टोला

Sanjay Raut

नाशिक :- आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर (Sudhakar badgujar) यांची महानगरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांच्या नाशिक भेटीनंतर खांदेपालट करण्यात आले आहे. बडगुजर हे राऊतांचे विश्वासू सहकारी मानले जातात. अनेक इच्छुकांना डावलून बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुधाकर बडगुजर हे नाशिक महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. अभ्यासू आणि आक्रमक भूमिकेसाठी ते ओळखले जातात. नाशकात शिवसेनेचा महापौर असेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.

दरम्यान, संजय राऊत यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारबाबत बोलताना भाजपला चिमटे काढले. नाशिकमधील बदलाविषयी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे. बाकी निवडणुका तुम्ही पाहिल्याच आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो आणि इतरांचे बालेकिल्ले ढासळले, असा खोचक टोला लगावतानाच जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे राऊत म्हणाले होते.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात आणीबाणी लागू करून फडणवीसांना पुन्हा सत्तेत यायचेय, संजय राऊत यांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER