सुधा मूर्तींनी सांगितली भगवान विष्णूंना आवडणारी आठ फुले

अधिक मास- २०२० : देवांच्या खरोखर आपल्याकडून फार कमी अपेक्षा असतात

Sudha Murti said eight flowers that Lord Vishnu loves.jpg

मुंबई : अनेकांच्या घरात देवाची पूजा होत असते. पूजेच्या वेळी गंधकासह अनेक देवांना आवडणारी तशी फुलंही वाहतो. महादेवाला बेल, कृष्णाला तुळस, गणपतीला जास्वंद, देवीला केवडा, दत्तगुरूंना चाफा, तसेच महाविष्णूंचे आवडते फूल कमळ आहे; मात्र, देव भावाचा भुकेला आहे. अधिक मासात अनेक जण देवाची उपासना करतात. या महिन्यात देव जागृत असतात अशी म्हण आहे.

परंतु, खरोखर जर देवांना अपेक्षित असलेली फुले आपण त्यांना वाहिली तर जीवनाचे नक्कीच सार्थक होईल. म्हणून अशीच काही फुले सांगितली आहेत प्रख्यात लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murti) यांनी. एकदा ‘कौन बनेगा करोडपती’च्या व्यासपीठावर आपल्या आजोबांकडून कृष्णभक्तीची कोणती शिकवण मिळाली, ते सांगितले. बालपणी सुधा मूर्ती यांना त्यांच्या आजोबांनी एक श्लोक शिकवला होता. त्यात, भगवान महाविष्णूंना प्रिय असलेली आठ पुष्पे कोणती, याची माहिती दिली होती. आजोबांनी अर्थासकट सांगितलेला श्लोक सुधा मूर्ती यांच्या बालमनावर ठसला. ती शिकवण आयुष्यभर आपल्या आचरणात आणून सुधा मूर्तींनी विष्णुभक्तीत कायमस्वरूपी आठ पुष्पे अर्पण केली.

ती आठ पुष्प कोणती? –

अहिंसा प्रथमं पुष्पम् पुष्पम् इन्द्रिय निग्रहम् ।
सर्व भूतदया पुष्पम् क्षमा पुष्पम् विशेषत:।
ध्यान पुष्पम् दान पुष्पम् योगपुष्पम् तथैवच।
सत्यम् अष्टविधम् पुष्पम् विष्णु प्रसिदम् करेत।।

या आठ पुष्पांचा अर्थ असा – जाणते-अजाणतेपणी हिंसा न करणे, अर्थात अहिंसा, हे पहिले पुष्प; मनावर नियंत्रण ठेवणे हे दुसरे पुष्प. सर्वांवर प्रेम करणे हे तिसरे पुष्प. सर्वांना क्षमा करणे हे चौथे पुष्प. दान करणे, ध्यान करणे, योग करणे ही विशेष पुष्पे आहेत. आणि नेहमी खरे बोलणे, सत्याची कास धरणे हे आठवे पुष्प आहे. जो भक्त भगवान महाविष्णूंना ही आठ पुष्पे अर्पण करतो, तो त्यांच्या कृपेस पात्र होतो. आपल्या देहरूपी वाटिकेत या सर्व गोष्टी आपल्या वागणुकीशी निगडित आहेत. म्हणून ‘आचार बदला, विचार बदलेल.’ कोणतीही कृती विचारपूर्वक केली पाहिजे. आपले विचार चांगले असले तर हातून वाईट काम, चुकीचे काम घडणारच नाही. कोणावर हात उगारणार नाही, अपशब्द बोलणार नाही, अतिरिक्त माया, संपत्ती गोळा करणार नाही, अनावश्यक गोष्टी साठवणार नाही, मनात कोणाबद्दल द्वेष ठेवणार नाही. कोणाही प्राणिमात्राचा, जीवजीवांचा दु:स्वास करणार नाही. ध्यान, दान, योग या बाबतीत सदैव तत्पर राहेन आणि शाळेतली शिकवण म्हणजे- ‘नेहमी खरे बोलेन.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER