गंगेत सापडला ‘सकरमाऊथ कॅटफिश’ इतर जलचरांना धोका !

Fish

वाराणसी : दक्षिण अमेरिकेच्या ऍमेझॉन नदीत सापडणारा ‘सकरमाऊथ कॅटफिश’ (Suckermouth catfish) मासा गंगा नदीत सापडल्याने तज्ज्ञांनी काळजी व्यक्त केली आहे. कारण हा मासा इतर जलचरांना खातो. गंगेत डॉल्फिन आहेत. डॉल्फिनलाही सकरमाऊथ कॅटफिशमुळे धोका निर्माण झाला आहे.

याआधीही एकदा गंगा नदीत सकरमाऊथ कॅटफिश आढळला होता.  त्यामुळे तज्ज्ञांनी काळजी व्यक्त केली आहे. बीएचयूच्या जंतू विभागाच्या तज्ज्ञांनी त्यावर संशोधन केलं. यानंतर या माशाची ओळख पटली. याबद्दल माहिती देताना बीएचयूचे प्राध्यापक बेचनलाल म्हणाले – ऍमेझॉन नदीत सापडणाऱ्या सकरमाऊथ कॅटफिशमुळे गंगा नदीतल्या माशांना मोठा धोका आहे. सकरमाऊथ कॅटफिश मांसाहारी आहे. पाण्यातल्या इतर माशांना तो खातो. रामनगरच्या रमना गावाजवळ सकरमाऊथ कॅटफिश आढळला आहे. बीएचयूच्या जंतू विभागाच्या तज्ज्ञांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या भागात आणखी सकरमाऊथ कॅटफिश आहेत का, याचा शोध घेणे सुरू आहे.

मासे कमी झालेत

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा नदीतल्या माशांची संख्या २० ते २५ टक्के कमी झाली आहे. सकरमाऊथ कॅटफिश हा मांसाहारी मासा गंगेत सापडल्यानंतर तज्ज्ञांनी याबाबत काळजी व्यक्त केली आहे. हा गंगेतील जलचरांसाठी व त्यातही डॉल्फिनसाठी मोठा धोका आहे, असे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER