पार्थ पवार तरूण, नवखे असल्याने अशा गोष्टी घडतात – राष्ट्रवादी

Parth Pawar-Nawab Malik

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आतापर्यंत दोनदा पक्षाच्या भूमिकेला छेद देणा-या भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे पार्थच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सुशांतसिंह प्रकरणात साबीआय (CBI) चौकशीसाठी महाराष्ट्र सरकार अनुकूल नसतानाही पार्थ यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली होती.

त्यानंतर आता पार्थ यांनी जय श्री राम म्हणत राममंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राम मंदिर निर्माणावर  मंदिर बांधून कोरोना जाणार असेल तर खुशाल बांधा असा टोला लगावला होता. त्याविरुद्ध भूमिका पार्थ यांनी घेतलेली दिसते. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ता नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सारवासरव केली असून पार्थ पवार (Parth Pawar)  तरूण, नवखे असल्याने अशा गोष्टी घडतात असे म्हटले आहे. नवाब मलिक यांनी मतभेदाच्या चर्चा उडवून लावल्या आहेत.ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.

पार्थ पवार सध्या राजकीय वर्तुळात पून्हा सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत. राज्याच्या राजकारणात चाललेल्या महत्त्वाच्या घडामोडींत ते आपले मत, भूमिका मांडताना दिसत आहेत. पार्थ पवार यांनी सुशांतसिंह आत्महत्या (Sushant Singh Suicide) चौकशी प्रकरणातदेखील भूमिका मांडली होती. 27 जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची भेट घेऊन अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे, असे ट्वीट पार्थ पवारांनी भेटीनंतर केले होते. परंतू, पार्थ पवारांची ही मागणी गृहमंत्री अनिल देशमूख यांनी फेटाळून लावली होती.

त्यानंतर आता पार्थ यांनी जय श्री रामाचा पत्रातून नारा दिला आहे. ‘जय श्रीराम’चा नारा देत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व आजोबा शरद पवार यांनी राममंदिर निर्माणाविरुद्ध भूमिका घेत “आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असे विधान केले असताना नातू पार्थ यांनी जय श्री रामचा नारा देणे यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, पार्थच्या या भूमिकेवर आजोबा शरद पवार व वडील उपमुख्यमंत्री अजित पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पार्थ यांचे  वय आणि नवखेपणा असे कारण देत या बाबीवर तात्पुरती सारवासारव केल्याचे दिसते आहे.

ही बातमी पण वाचा : पार्थ पवारांचे ‘जय श्री राम’; लोकशाहीत प्रत्येकाला वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार – सुप्रिया सुळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER