संवादाची ऐशी तैशी

two people talking in anger

सगळ्या संत महंतांनी संवादाचे महत्त्व वर्णन केलेले आहे आणि आपल्यालाही सगळ्यांना ते माहिती आहे. पण आताच्या काळात संवाद हरवतो आहे अस आपण नेहमीच ऐकतो. आपल्याला ते पटत ही . बरेचसे प्रसंग दररोजच्या आयुष्यात घडत असतात. यामागचे उत्तर शोधतांना आपल्याला बहुदा काही कारणं नेहमीच जाणवत असतात. त्या कारणांपैकी जास्त महत्त्व आपण वेळ नसणे या एकाच गोष्टीला देतो. पण बरेचदा असं ही घडतं की सगळे घरात एका ठिकाणी असतानाही वाद होत नाही पण जेमतेम संवाद होतो .त्याचा सुसंवाद होऊ शकत नाही. असं का होतं ? याचं कारण शोधताना मला एक प्रसंग आठवला. माझी मैत्रीण सुषमा नेहमीच मला सांगायची की ,”मी क्लिनिक मधून घरी गेले की माझ्या सासूबाईंना मी घरात पाऊल टाकल्या टाकल्या खूप काही गोष्टी मला सांगायच्या असतात .

आणि मला मात्र पूर्ण शांतता हवी असते,निदान काही वेळ तरी. कारण वेगवेगळ्या समस्या घेऊन येणाऱ्या लोकांना समुपदेशन केल्यानंतर मला माझी थोडी शांतता हवी असते.” हा प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे अनेक घरात घडत असतो. दिवसभर घर सांभाळणारी व्यक्ती महत्वाचे निरोप परत विसरून जाऊ नये म्हणून, दिवसभरातल्या घटना सांगायला पाहते. आणि घरी येणार्‍या व्यक्तीला त्या आल्या आल्या नकोशा वाटतात. त्यात दोष कोणाचाच नसतो.

असाच एक प्रसंग ! सकाळची वेळ. सगळ्यांकडे असते तशीच घाईची .पण त्यातही रूटीन असलं तर ते तरी ठरलेलं असतं, घरात चार माणसं म्हटली की ठरावीत रुटीन राखणे अवघड ,आणि त्यात तीन पिढ्या जर एका ठिकाणी असतील तर फारच गंमत येते. हेच बघा ना ! वंदनाने मिस्टरांचा टिफिन भरला. पोळ्यावाल्या मावशी तेथून बाजूला सरकल्यावर ,थोडी जागा झाल्याने तिला जागा मिळाली .पटकन एकीकडे दूध तापवायला ठेवले .दुसऱ्या बर्नर वर सासर्‍यांचा दहा वाजताचा चहा करायचा होता. तिसऱ्या बर्नरवर मुलांसाठी पोहे करायचे होते. राघव ,आर्यन ,ऐश्वर्या अशी घरातील मुलं भावा – भावांची उद्या पुण्याला कॉलेज आता सुरू होणार म्हणून गावाला जाणार होती.

सगळ्या मुलांच्या आवडीचे पदार्थ करतानाचा एकच पदार्थ राहिला होता .हे पोहे म्हणजे राघवला खास अकोल्याच्या सातव चौकातल्या सारखे हवे होते तसे !किती खटपट केली होती तिने तसे बनवण्यासाठी .त्या प्रयोगातच एकदा ते थोडे कडकडीत झाले आणि आता तेच कडकडे पोहे राघवची आवडती रेसिपी बनले. आता तिच्यासाठी ही कठीणच गोष्ट होऊन बसली ही पोहे खाली लागून कडकडीत तर व्हायला हवेत ,तेही प्रमाणातच ! एकीकडे वंदनाच्या मनात मुले उद्या जाणार म्हणून रुखरुख होतीच. तिचा प्लॅन मनात सुरू होता .त्यांच्याबरोबर द्यायचा चिवडा, मठरी दुपारी करायची आहे .त्यांचे सामान नीट पॅक करतात की नाही? अजून काही लागणार आहे का ? बाजारातून काही आणायचे का ?वगैरे बघायचं आहे.

तेवढ्यात काकू (सासुबाई) ओवा घेऊन आल्या. त्या मागच्याच आठवड्यात खारवलेला ओवा करणार होत्या. त्या सांगू लागल्या ,” खारवलेला ओवा करण्यासाठी लिंब मागवली आहेत….!”. “अरे! आपण मागच्या आठवड्यातच केला होता ना ?”इती वंदना. हो मागच्यावेळी केलाच नाही ,तशीच संपली लिंब ! त्यांना अजून बऱ्याच गोष्टी बोलायचे होत्या .त्या सांगत होत्या ,”एवढाच आहे की आणखी आहे कुठे ओवा ? दररोजच्या वापराच्या डब्यामध्ये हवा आहे का? एवढा केला की भक्कम होणार आहे. दुपारी मला वेळ होईल तेव्हा पाणी भाजेन , तेवढा दाण्याचा डबा काढून ठेव. “वगैरे .वंदना फक्त हू हुं ! करत होती .तीच पूर्ण लक्ष नव्हतं त्यावेळी.

पाण्याची मोटर लावली होती, त्याचा प्रचंड आवाज होतो आजकाल. तिथेच सासूबाईंनी कुठलीतरी बारीक आवाजात म्युझिक लावलं होतं, मनाला शांतता देणारे म्हणून ! नवरा तेवढ्यात हॉलमधून काहीतरी सांगत होता. तिला फक्त “पाण्याची मोटर “एवढच ऐकू आलं. बंद करायची वेळ झाली असं समजून तिने पटकन जाऊन मोटर बंद केली. त्यावर नवरा म्हणाला,” अगं बंद करायला अजून पंधरा वीस मिनिटे आहे असं म्हटलं मी ! “तिने परत जाऊन मोटर सुरू केली. आवाजात भर म्हणूनच की काय बाहेर तेवढ्यात कचऱ्या च्या घंटागाडीचा आवाज कानावर पडत होता.

सकाळीच तिच्या चुलत जावेचा रेणुकाचा फोन आला होता पण डब्याची गडबड म्हणून तिने उचलला नाही. थोड्यावेळाने परत करू ,असा तिचा विचार होता. तेवढ्यात तिला परत रेणुकाने फोन केला. “वहिनी घाईत आहेस का ग ?अग परत मुलांचे ऑनलाईन क्लासेस सुरू होतील फोन वर मग फोन मिळणार नाही हातात .म्हणून फोन केला परत घाईने. “वंदना म्हणाली ,”ओके ! पण सांग आता पटकन काय विशेष ते ? “.”अगं !आमच्या येण्याच्या प्रोग्राम बद्दल सांगत होते.” तिच्या दुसऱ्या चुलत जावेला मुलगी झालेली असल्याने तिच्याकडे जाताना रेणुका, वंदना कडे येणार होती. तेवढ्यात वंदनाने विचारून घेतले की ,”तू काय काय घेतेस ?खाऊ ड्रेस तिच्यासाठी ? “ओके! तू डिंकाचे लाडू घेतेस तर मी अळीवाचे देते ! आणि बाकी सगळं व्यवस्थित ठरवून दोघींनी फोन ठेवला .

पूर्ण लॉक डाऊन , केसांची झुल्फ वाढवून आणि हेअर बँड वगैरे लावायची हौस राघवने पूर्ण करून घेतली. आज सकाळी सकाळी त्याने कटिंग दाढी करून आला. कारण आता कॉलेज वरून सुरू होणार होतं. आंघोळीला जातानाच त्याने अा ss ई s s भू ss क ! अशी हाळी दिली.

“हो रे! मन्या करतेच आहे.!” तिच्या लक्षात आलं की आपण किती वेळा पासून फक्त पोहे करते एवढंच म्हणतोय. काहीतरी बँकेची काम काढलेल्या नवऱ्याने मुलांचे व स्वतःचे पॅन कार्ड आधार कार्ड मागितले .आणि वंदनाने या सगळ्या आवाजात आवाज मिसळतच चिंटू ला आवाज दिला,”चिंटू ss !” लिंबू पाणी आणि चहा घेऊन घे !”आणि मग पाणी गरम करण्यासाठी लावलेल्या ओव्हन चा आवाज या आवाजांमध्ये कुठेच विरला !

हाय फ्रेंड्स !मी ही कथा किंवा प्रसंग तुम्हाला एक होण्याचे कारण काय असेल बरे? यात घरातील प्रत्येक सदस्य आपल्या आपल्या वयानुसार आणि भूमिकेनुसार आपल्या वेगळ्याच स्वतंत्र व्यापात आणि कामात अडकलेला असतो, मग्न असतो. यातच बघाना ! आजींना आजोबांची पोटाची तक्रार दूर राहावी यासाठी आठवणीने ओवा बनवायचा असतो. आणि मध्येच कुठेतरी त्यांना गावाकडच्या एका मुलाचे लग्न ठरले हे सांगावेसे वाटते. कुणाचा तरी फोन आला होता तेही त्यांना तेव्हाच सांगावेसे वाटते. पण तरीही कामाची घाई बघून अजून काही सांगायचा मोह आवरतात. तो त्यांच्या विश्वाचा भाग असतो, त्यांची ती प्राथमिकता असते.

नवरा आपल्या व्यापात. कामात! कामाला जाण्याआधी असल्याचे आणि मुलांचे बँकेची कुठलीतरी कामात करतोय. पण ते करताना पाण्याची मोटर लावल्याने आणखीन गोंधळ झाला आहे .मुले तर इकडे एवढे दिवस घरी राहिली .आता स्वयंपाकाला बाई लावायची? की डबे लावायचे वगैरे. पैशाचे कॅल्क्युलेशन करत बसलीत. ती आत्ताच आपल्या कॉलेज आणि कामापर्यंत मनाने पोहोचली होती देखील ! सासरे काही म्हणत नसले तरीही दहा वाजून वीस मिनिटे झाली .अजून चहा कसा कोणी आणत नाही ? याचा विचार करत आहेत (वेळा चुकलेल्या त्यांच्या विश्वात चालत नाहीत.) आणि या सगळ्यामध्ये वंदनाची “नाच ग घुमा ,कशी मी नाचू ? “अशी अवस्था होते. आपण बघितल , येथे प्रत्येक जण आपल्या विश्वात गर्क झाला आहे. अर्थात निष्फळतेने नव्हे ! तर आपल्या आपल्या भूमिकेत ,जी कर्तव्य आहेत ,तीच ते योग्य पद्धतीने सगळेजण करत आहेत.

हे सगळं करताना संवादात काही समस्या किंवा प्रश्न निर्माण होत असतील असं तुम्हाला वाटतं का ? संवाद संपला आहे किंवा हरवला आहे वगैरे गोष्टी आपण म्हणतो. पण तो ज्याकोणालाही हरवायला नको आहे असं वाटणारी ही सगळी माणसे म्हटली तरी प्रत्येकाची विश्व, अवकाश, त्यांच्या विविध भूमिका, कर्तव्य या गोष्टींमुळे,आणि सुसंस्कृत पणामुळे वाद जरी झाला नाही , तरीही संवाद होणं अवघड होतं.

पण फ्रेंड्स ! संवाद तर गरजेचे आहे. मग तो कसा फुलवता येईल ? वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ? वेगवेगळ्या वयामध्ये यावर विचार करावा लागेल. सुसंस्कृत सुशिक्षित लोकांमध्येही वाद-संवाद मुळे होणारे ताण येत नाही असे नाही? त्याची कारणे काय? कुठल्या विचारांमधून यावर मात करता येईल? बघायलाच लागेल !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER