‘कुठे गेला मराठीबाणा? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही मिळणार नाहीत’

devendra fadnavis

मुंबई :- शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा!” अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

संतापजनक! कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” असं फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. तसेच, भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, अशी मागणी देखील फडणवीस यांनी ट्विटद्वारे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER