असे आंडू-पांडू खूप आले, संभाजी भिडेंच्या भूमिकेवर संजय राऊत आक्रमक

Sanjay Raut - sambhaji-bhide -Maharastra Today
Sanjay Raut - sambhaji-bhide -Maharastra Today

मुंबई : कोरोनाने (Corona) मरणारी माणसं जगण्याच्याच लायकीची नाहीत. कोरोना हा मूळात रोगच नाही. त्यामुळे त्यावरुन सुरु असलेला लॉकडाऊनचा (Lockdown) बावळटपणा सरकारने बंद करावा, असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. या वादग्रस्त वक्तव्यावरून सर्व स्तरावरून भिडे यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे . आता, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भिडेंवर टीका केली.

भारतीय जनता पक्षाचे एक विचारक आहेत, त्यांनी कोरोनाने मरणाऱ्या लोकांबद्दल अपशब्द वापरले आहेत. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आम्ही कोण आहोत, महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खूप येऊन गेले. महाराष्ट्राने अशा आंडू-पांडूंना धडा शिकवलाय, अशा शब्दात राऊत यांनी संभीज भिडेंवर (Sambhaji Bhide) टीका केली. आतासुद्धा शिवसेना म्हणून, महाराष्ट्र म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं. तर, पळता भूई थोडी होईल, असे राऊत यांनी म्हटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button