बॉलिवूडमधील असेही यशस्वी पिता पुत्र

Farhan Akhtar - Javed Akhtar

सुशांत सिंहच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर बॉलिवूडमधील (Bollywod) नेपोटिझमची चर्चा जोरात सुरु आहे. यशस्वी नायकाचा मुलगा नायक, यशस्वी दिग्दर्शकाचा मुलगा दिग्दर्शक होतो असे दिसून आले आहे आणि अशी अनेक उदाहरणेही आहेत. मात्र बॉलिवूडमध्ये अशाही काही पिता पुत्रांच्या जोड्या आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्येच वेगवेगळ्या क्षेत्रात यश, पैसा आणि लोकप्रियता कमवली आहे. यात अॅक्शन दिग्दर्शकांच्या मुलांनी नायक, दिग्दर्शक म्हणून नाव कमावले आहे तर नायकाच्या सेक्रेटरीच्या मुलाने दिग्दर्शक म्हणून नाव कमावले आहे. अशाच या वेगळ्या पित-पुत्रांच्या जोड्यांवर एक नजर

या यादीत सगळ्यात वर नाव घ्यावे लागेल वीरू देवगन (Viru Devgn) आणि अजय देवगन (Ajay Devgn) यांचे. वीरू देवगन म्हणजे बॉलिवूडमधील एक प्रचंड यशस्वी अॅक्शन डायरेक्टर. चित्रपटातील हाणामारीच्या अनेक दृश्यांत त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरले आणि अॅक्शन दृश्यांना एक वेगळी उंची मिळवून दिली. 80 च्या दशकात वीरू देवगन प्रचंड यशस्वी होते. खरे तर त्यांनाही नायक व्हायचे होते. पण ते होऊ न शकल्याने त्यांनी अजयमध्ये नायकाचे गुण विकसित केले. अजयचा चेहरा नसतानाही तो आज यशस्वी नायक म्हणून चित्रपटसृष्टीत लोकप्रिय आहे. केवळ अभिनयच नव्हे तर अजयने चित्रपट निर्मितीतही हात घातला असून यशस्वी चित्रपटांची निर्मितीही केली आहे.

या यादीत दुसरे नाव घेता येईल लोकप्रिय खलनायक शेट्टी आणि त्याचा मुलगा रोहित शेट्टी (Rohit Shetty). तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल हे काय? परंतु हे खरे आहे. 80-90 च्या काळात चित्रपटांमध्ये जो एक भला धिप्पाड संपूर्णपणे टक्कल असलेला शेट्टी नावाचा जो व्हिलन असायचा रोहित हा त्याचाच मुलगा. शेट्टीचे पूर्ण नाव मुद्दु बाबू शेट्टी. पण तो शेट्टी नावानेच लोकप्रिय होता. रोहित लहानपणापासूनच शेट्टीसोबत सेटवर जायचा. अॅक्शन दृश्ये बघून रोमांचित व्हायचा. अजय देवगनच्या पहिल्या फूल और कांटे चित्रपटाच्या वेळी रोहितने दिग्दर्शक कुकू कोहलीला सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनीस बाजमीचा सहाय्यक म्हणूनही काही चित्रपट केले. अजय देवगनशी चांगली मैत्री असल्याने अजय, अभिषेक बच्चन अभिनीत ‘जमीन’ चित्रपटापासून तो दिग्दर्शनात उतरला आणि त्यानंतर यश मिळवत गेला. आजही अजय आणि रोहितची मैत्री अत्यंत घट्ट आहे.

या यादीत तिसरे नावही एक अॅक्शन दिग्दर्शक आणि त्याच्या यशस्वी नायक मुलाचेच आहे. नव्या लाटेतील या नायकाचे नाव आहे विकी कौशल (Vicky Kaushal). फार कमी जणांना ठाऊक आहे की, त्याचे वडिल श्याम कौशल हे 90 च्या दशकात बॉलिवूडमधील एक प्रचंड यशस्वी अॅक्शन दिग्दर्शक होते. अॅक्शनची योजना आखताना त्यांनी अनेक नवीन कल्पना राबवल्या होत्या. नाना पाटेकर आणि त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत. नानाने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रहार’ चित्रपटातील अॅक्शन श्याम कौशल यांनीच केले होते. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ऋतिक रोशन (Hritik Roshan) आणि टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) ‘वॉर’ चित्रपटाचेही अॅक्शन डायरेक्टर तेच होते. मात्र विकीने पित्याप्रमाणे अॅक्शनमध्ये रुची न दाखवता अभिनयाकडे लक्ष दिले. मसानने चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या विकीने संजू, उरी चित्रपटांमुळे चांगलेच यश मिळवले असून त्याच्याकडे सध्या मोठ्या बॅनरचे अनेक चित्रपट आहेत.

Farhan Akhtar reacts to father Javed Akhtar receiving threats for his  statement on banning 'burqa' : Bollywood News - Bollywood Hungamaया यादीत पुढील नाव आहे प्रख्यात संवाद लेखक, गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि त्यांचा निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता असलेला पुत्र फरहान अख्तर (Farhan Akhtar). जावेद अख्तर यांना लिखाणाची आवड असल्याने ते चित्रपटात संवाद लेखक बनण्यासाठी आले. परंतु त्यांना लगेच काही काम मिळाले नाही. स्टुडियोत, मित्राच्या घरी झोपून त्यांनी संघर्ष केला. या संघर्षाचे फळ म्हणजेच त्यांना मिळालेले प्रचंड यश. चित्रपटाच्या पोस्टरवर लेखकाचे नाव देण्यास त्यांनीच निर्मात्यांना भाग पाडले. आजही ते सक्रिय आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाने फरहान आणि मुलगी झोयाला दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागला नाही. फरहानने निर्माता. दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून सध्या चांगलेच यश मिळवलेले आहे. झोया अख्तरही चांगली दिग्दर्शिका म्हणून नाव कमवून आहे.

बॉलिवूडमध्ये अशाही काही वेगळ्या पिता-पुत्रांच्या जोड्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER