मोदी योगींच्या राजवटीत अश्याच निकालाची अपेक्षा होती – शरद पवार

मुंबई : बहुप्रतिक्षित बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी (Babri Masjid demolition case) आज सीबीआयचे (CBI) विशेष न्यायाधीश लखनऊतील विशेष न्यायालयात आपला निर्णय दिला. अयोध्येतील बाबरी मशिदीचे अवशेष पाडणे हा पूर्वनियोजित कट नसून तो असमाजिक तत्वांकडून अचानक झालेली कृती होती, असे निरीक्षण नोंदवत सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बाबरी विध्वंस प्रकरणी सर्वच्या सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा महत्वपूर्ण निकाल आज जाहीर केला. या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली.

बहुप्रतिक्षित बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आपला निर्णय दिला. यात सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मोदी आणि योगींच्या राजवटीत अश्याच निकालाची अपेक्षा होती. असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर उपरोधिक टीका केली. तसेच हा न्यायालयाचा निकाल असल्याने त्यावर भाष्य करणार नाही. असेही पवारांनी म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणात आरोपी असलेले लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडे, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुरसिंग, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रजभूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडे, अमर नाथ गोयल, जयभानसिंग पवईया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला , आरएन श्रीवास्तव, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीरकुमार कक्कर आणि धर्मेंद्रसिंग गुर्जर यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER