संग्रामचा नाट्य परंपरेला असाही मानाचा मुजरा

Sangram Samel

“माझ्यातला मी मरायला हवा… पण अजून माया मरत नाही… अजून पाश सुटत नाही… नाळ तुटत नाही… का? अश्रूंची झाली फुले या नाटकातील वसंत कानेटकर यांच्या लेखणीतून उतरलेलं हे एक अफलातून वाक्य. सोबत अभिनेता संग्राम संमेळ याचा स्टाइलिश लूकमधला फोटो. आता तुम्ही म्हणाल हे काय समीकरण आहे? पण ही अफलातून कल्पना अभिनेता संग्राम समेळ यांच्या डोक्यातून आली आहे आणि त्याने यापुढे त्याच्या सगळ्या नव्या फोटोसेशनसाठी वेगवेगळ्या नाटकातील संवाद किंवा नाटकाची ऑनलाइन स्टोरी सांगणारी वाक्य कॅप्शन म्हणून द्यायचं ठरवलं आहे. या निमित्ताने आपल्या नाट्य परंपरेला मानाचा मुजरा संग्राम करणार आहे. ग्रे कलरचा टी शर्ट व्हाईट शर्ट आणि जीन्स पॅन्ट असा एक खास फोटो संग्रामने त्याच्या इन्स्टा पेजवर शेयर केला.

कलाकार त्यांच्या सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असतात. आणि या फोटोकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेलं असतं. संग्रामचा हा फोटो पाहून त्याला लाईक करण्यासाठी मोबाईलच्या बटनाकडे चाहत्यांची नजर गेली आणि त्यांचे लक्ष गेले ते या फोटोसोबत असलेल्या कॅप्शन कडे.

संग्रामने फोटोसोबत असे लिहिले आहे की,. आपण नेहमीच आपल्या फोटोखाली एखाद्या गाण्याच्या ओळी किंवा कवितेच्या ओळी लिहित असतो. संग्राम सांगतो, मला असं वाटलं की आपण आपल्या मराठी रंगभूमीवर अशी अनेक नाटकं आहेत की त्यातले संवाद आजही आपल्या ओठावर येत असतात. नाटकाचे प्रयोग बंद झाले तरी त्यातल्या व्यक्तिरेखा, त्यांचे संवाद लक्षात राहतात. अनेकदा असंही होतं की त्या नाटकातल्या संवादामुळे किंवा त्यातल्या कलाकारांच्या नावामुळे ही नाटकं कधीही विस्मरणात जात नाहीत. अश्रूंची झाली फुले या नाटकातील ओळ मला या माझ्या नव्या फोटोसाठी आठवली आणि मग माझ्या मनात विचार आला यापुढे नवीन फोटो सेशन साठी हीच थीम का घेऊ नये? याच विचारातून संग्रामने हा वेगळाच ट्रेंड सोशल मीडियावर सेट केला आहे.

नुकताच सुखाच्या सरिनी हे मन बावरे या मालिकेमध्ये सम्राट या व्यक्तिरेखेचे मध्ये संग्रामचा अभिनय आपण पाहिला. सुरुवातीला सुरूवातीला परदेशात शिकून आता घरचा बिजनेस सांभाळायला आलेला एक सोज्वळ मुलगा असा लूक घेत संग्रामची या मालिकेत एन्ट्री झाली. मात्र त्यानंतर त्याच्यातला खलनायक जागा झाला आणि त्याची ही भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली. यापूर्वी पुढचं पाऊल या मालिकेतील संग्राम ने साकारलेली समीर ही भूमिका तर बाप माणूस या मालिकेत त्याची हर्षवर्धन ही बॅड बॉय इमेज प्रेक्षकांना आवडली होती. संग्रामचे ब्रेव्ह हार्ट या सिनेमातून मोठ्या पदद्यावर आगमन झाले. स्विटी सातारकर या सिनेमात तो अमृता देशमुखसोबत झळकला होता. विकी वेलिंगकरच्या टायटल रोलमध्येही त्याने बाजी मारली.

अभिनेत्री पल्लवी पाटील सोबत त्याचे लग्न झाले असून ते दोघेदेखील सतत वेगवेगळे फोटो अपलोड करत असतात.
संग्रामला नाटकाविषयी इतके प्रेम वाटण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संग्रामचे वडील अशोक समेळ हे स्वतः नाटककार आहेत तसेच अभिनेतेही आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच संग्रामच्या घरी नाटकाविषयीचे वातावरण त्याने पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे. कुसुम मनोहर लेले या नाटकाच्या नव्या संचात संग्रामने अभिनय केला आहे.

आता केवळ आपले फोटो शेअर करणे आणि त्याच्यावर येणाऱ्या कमेंट वाचणं इथपर्यंत सोशल मीडियाचा वापर करण्यापेक्षा यानिमित्ताने नाट्य परंपरेतील अनेक चांगल्या नाटकातील काही संवाद, फोटोसोबत शेअर करण्याची भन्नाट कल्पना संग्रामने मांडली आहे. त्याच्या या नव्या प्रयोगाला त्याच्या इंडस्ट्री मधल्या मित्रमंडळींनी तसेच चाहत्यांनी देखील मनापासून दाद दिली आहे.

ही बातमी पण वाचा : आजोबांकडून खूप शिकलो

 

View this post on Instagram

 

माझ्यातला मी मरायला हवा. माझ्यातला मी मरायलाच हवा, पण अजून माया मरत नाही, पाश सुटत नाही, नाळ तुटत नाही. का? प्रा. वसंत कानेटकर. नाटक – अश्रूंची झाली फुले तर, आपल्याकडे Photo upload करताना कुठलातरी swagger आणि attitude वाला quote, किंवा हिंदी गझल किंवा हिंदी कवितेतल्या ओळी किंवा एखाद्या गाण्यातल्या ओळी लिहायची एक आगळी वेगळी पद्धत आहे. हे माझे नवीन photoshoot मधले photos upload करताना मी आपल्या मराठी नाटकातले काही Full power, attitude, swag आणि दर्द वाले dialogues लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या नाटकांची आठवण काढुया. Photo Credit – @sagar_deodhar love you for this. #actor #photoshoot

A post shared by Sangram Samel (@sangramsamel) on


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER