काँग्रेसच्या अशा घुमजावमुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक

Sanjay Raut & Congress.jpg

मुंबई :- शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चार दिवसांपूर्वी अग्रलेख लिहून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. त्यामुळे काँग्रेसचा स्वाभिमान अचानक जागृत झाला आणि दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या स्थापना दिन कार्यक्रमात पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एस. के. पाटील (S.K. Patil) यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली असून आता शिवसेनेला दणका देण्याच्या विचारात आहे असे बोलले जाऊ लागले,पण तेवढ्यात माशी शिंकली. पाटील यांनी स्वबाळाच्या नाऱ्यावर पूर्णपणे यू-टर्न घेतला.

आगामी मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस एकट्याने लढविणार असल्याची घोषणा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी काँग्रेसच्या स्थापना दिन आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप यांच्या पदग्रहणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली होती. मात्र मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी घूमजाव केला. प्रसारमाध्यमात आलेल्या वृत्तावर आपण भाष्य करत नसल्याचे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. दोन दिवसांपूर्वी पाटील यांनी एकला चलो रे ची घोषणा केली होती. त्यांच्यानंतर मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान यांनीही याच पध्दतीचे वक्तव्य करत शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा दिला. परंतु आज त्यांनी त्याबाबत पूर्णतः यु टर्न घेत आगामी मुंबई महापालिका निवडणूका स्वबळावर लढविण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र त्याबाबत सूचना प्राप्त झाल्याचे सांगत कालच्या कार्यक्रमात फक्त शिवसेनेतील नेत्यांना इशारा देण्याचा होता असे पाटील यांनी स्पष्ट केले.

पटेल यांनी आधी स्वबळाची भाषा केली तेव्हा त्यांच्या या घोषणेचा आम काँग्रेस कार्यकर्त्यांना आनंद झाला होता.मुंबई महापालिकेत शिवसेनेबरोबर युती करू नये असे कट्टर काँग्रेस जनांचे म्हणणे आहे आणि तशी भावना त्यांनी वेळोवेळी पक्षाच्या नेत्यांकडे व्यक्तदेखील केलेली आहे.या भावनेचा आदर पटेल यांनी केला आणि तेही स्वबळाची भाषा करू लागले असे काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने आशादायी चित्र होते पण आज त्यांनी जणू मी तसे बोललोच नव्हतो असा आश्चर्यकारक पवित्रा घेतला. मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस हे वर्षानुवर्षे एकमेकांचे परंपरागत राजकीय स्पर्धक राहिले आहेत.

उद्या काँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार असेल तर आम्हालाही जय भवानी जय शिवाजी म्हणावे लागेल. आम्हाला शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरावे लागेल. वर्षानुवर्षे आम्ही निष्ठेने काँग्रेसमध्ये काम करत आलो आहोत.त्या निष्‍ठेचे काय असा सवाल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्र टुडेशी बोलताना केला.

ही बातमी पण वाचा : तुम लाख कोशिश करलो, मुझे बदनाम करने की …; संजय राऊत यांचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER