एवढे मोठे षडयंत्र रचले गेले तरीही गृहमंत्र्यांना थांगपत्ता नाही! भाजपाचा टोमणा

Devendra fadnavis - Anil Deshmukh

मुंबई :- पूजा चव्हाण आत्महत्या आणि सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात अपयश आल्यामुळे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे असलेलं गृह खातं काढून घेण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट होणार, असे संकेत मिळत आहेत. गृहमंत्री बदलण्यासंदर्भात भाजपाने ट्विट करत सरकारवर टीका केली आहे – ‘एवढे मोठे षडयंत्र रचले गेले तरीही गृहमंत्र्यांना थांगपत्ता नाही!

शिवसेनेचा आशीर्वाद असणाऱ्या सचिन वाझेने (Sachin Vaze) दहशतवादाचा कट रचला. त्या कारमध्ये १९ जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. खुद्द एपीआयकडून एवढे मोठे षडयंत्र रचले गेले असताना गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांना कसलाच थांगपत्ता लागला नाही, हे नवलच! गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा!’ असे ट्विट करत भारतीय जनता पार्टीने गृहमंत्राच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले होते की, गृहमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याबाबत कोणतेही अंदाज बांधण्याची गरज नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही. अशा वावड्या उठवण्याची आश्यकता नाही. राज्याच्या गृहमंत्रिपदी अनिल देशमुख हेच राहणार आहेत. माध्यमांमध्ये कुणाच्याही नावांची चर्चा असली तरी खातेबदल होण्याची शक्यता नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER