राज ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया; आज डिस्चार्ज होणार

Raj Thackeray Maharastra Today

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज होणार आहे. त्यांच्या कमरेजवळचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर शनिवारी लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) शस्त्रक्रिया करण्यात आली. राज ठाकरे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याने त्यांना आज घरी सोडण्यात येणार आहे.

काल राज ठाकरे यांना अचानक लीलावती रुग्णालायत दाखल करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही राज ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते. यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्याशी लॉकडाऊनसंदर्भात (Lockdown) काही चर्चा करणार का, हे पाहावे लागेल.

कंबरेचा स्नायू दुखावला गेला

राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी ३ दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात MRI चाचणी केली होती. त्या स्नायूवर छोटी शत्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवले जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कंबरेच्या दुखण्याच्या त्रासाची माहिती जाणून घेत विचारपूस केली. तसेच लीलावती रुग्णालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याचेही सुचवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button