पेटंट मिळाले : शिवाजी विद्यापीठात ब्रेस्ट कॅन्सरवर औषधाचे यशस्वी संशोधन

Successful research on breast cancer medicine at Shivaji University

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या रसायन शास्त्रज्ञांनी (ब्रेस्ट कॅन्सर) स्तनांच्या कर्करोगाबाबत (breast cancer medicine ) सर्वसामान्य पेशींना अपाय न करता केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणाऱ्या औषधाचे यशस्वी संशोधन केले आहे. रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ. गजानन राशिनकर व त्यांचे विद्यार्थी डॉ. प्रकाश बनसोडे यांनी ही बहुमोल कामगिरी केली असून भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने संशोधनाचे पेटंट प्रमाणपत्र त्यांना दिले आहे. यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या ( Shivaji University)शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

डॉ. राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बनसोडे यांनी ‘सिंथेटिक स्टडीज इन न्यू अँटीकॅन्सर थेराप्युटिक्स’ या विषयावर पीएच.डी. संशोधन केले. कर्करोगावरील केमोथेरपी उपचारांमध्ये चांदी, सोने व प्लॅटिनम या राजधातूंना त्यांच्या विशिष्ट जैविक गुणधर्मांमुळे विशेष महत्त्व आहे. परंतु धातूंचे सामान्य पेशींवर दुष्परिणाम होतात. कर्करोगावरील औषधे सामान्य पेशी व कर्करोगाच्या पेशी यात फरक करण्यास असमर्थ ठरतात. यामुळे रुग्णांना केमोथेरपी उपचारादरम्यान औषधांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. स्तनांच्या कर्करोगावर उपयुक्त टॅमॉक्सीफेन औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी व उपचाराची उपयुक्तता वाढविण्यासाठी फेरोसिन हा घटक वापरून फेरोसीफेन हे उपयुक्त औषध तयार करण्यात यश आले आहे. फेरोसिन हा घटक मानवी शरीरास अपायकारक नाही हेही संशोधनातून सिद्ध झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER