शंभूराज देसाईंना यश, 107 पैकी 68 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा विजय

Shambhuraj Desai

सातारा :  पाटण विधानसभा मतदारसंघात नुकतीच ग्रामपंचायत निवडणुक पार पडली. पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीच्या सलग तीन दिवस सुरु असलेल्या सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया आज पूर्ण झाली. पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीपैकी 68 ग्रामपंचायतींवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या (Shambhuraj Desai)मार्गदर्शनाखाली शिवसेना (Shiv Sena ) पक्षाची सत्ता आली आहे. 68 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना पक्षाचे 68 सरपंच आणि 67 उपसरपंच विराजमान झाले आहेत. सरपंच, उपसरपंचपदी निवड झालेल्यांचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी विशेष अभिनंदन केले आहे.

संपुर्ण पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण 119 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये पाटण तालुक्यातील 107 तर पाटण मतदारसंघातील सुपने तांबवे पंचायत समिती गणामध्ये 12 ग्रामपंचायतींचा समावेश होता. निवडणूका पार पडलेल्या 119 ग्रामपंचायतीपैकी एकूण 75 ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने चांगलीच बाजी मारत पाटण विधानसभा मतदारसंघात एकहाती सत्ता मिळविली आहे.

शंभूराज देसाई हे राज्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकांकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER