सतेज पाटील यांच्या प्रयत्नांना यश : शिक्षक मतदार संघातूम मात्तबरांची माघार

Satej Patil

कोल्हापूर : गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या प्रयत्नांना यश आले. विधानपरिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले शिक्षक नेते दादासाहेब लाड, राज्य कृती समितीचे बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य कायम शाळा विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे, शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मानसिंगराज निंबाळकर आणि इचलकरंजी येथील संभाजीराव खोचरे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. कोल्हापुरातील प्रमुख उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर यांना होईल असा दावा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व काँग्रेसतर्फे (Congress) करण्यात येत आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातून शिक्षक मतदारसंघासाठी एकच उमेदवार असावा यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान काँग्रेसकडे एकूण ११ जणांनी उमेदवारी मागितली होती. दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या ट्रॅक्टर रॅलीप्रसंगी ‘पुणे विभागीय मतदारसंघातून शिक्षक किंवा पदवीधरमधील एक जागा आम्हाला द्या,निवडून आणण्याची जबाबदारी माझी’अशी ग्वाही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिली होती. पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी राष्ट्रवादीकडून  (NCP) अरुण लाड (Arun Lad) यांना तर शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी काँग्रेसकडून जयंत आसगावकर यांना जाहीर झाली.

‘शिक्षक’साठी काँग्रेसकडे मुलाखती दिलेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू होते. मंगळवारी, ता. १७ रोजी उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस होता. तत्पूर्वी पालकमंत्री पाटील यांनी अन्य उमेदवारांशी चर्चा केली होती. संबंधितांनी उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यासंबंधी चर्चा केली होती. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेकांनी मंगळवारी उमेदवार मागे घेत असल्याची घोषणा केली. ‘कोजिमाशि’चे तज्ज्ञ संचालक व शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे म्हटले आहे. राज्य शाळा कृती समितीचे बाबासाहेब पाटील टाकवडेकर आणि महाराष्ट्र राज्य कायम शाळा विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे, शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER